Mumbai News
Mumbai News 
मुंबई

Mumbai News : मध्य रेल्वेची लोकल सेवा दररोजच १५ ते २० मिनिटे विलंबाने!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेवरील जलद लोकल गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, लांबपल्ल्याचा गाडयांना मार्गिका उपलब्ध करून देत असल्याने सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे भर उन्हाळयात प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागत आहेत.

यंदा शेकडो उन्हाळी विशेष गाड्या मध्य रेल्वेकडून चालविण्यात येत आहे. त्यामुळे नियमितपणे धावणाऱ्या मेल-एक्सप्रेस आणि उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजनाचे तीन-तेरा वाजले आहे. अनेक मेल- एक्सप्रेस आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने त्यांच्या फटका उपनगरीय लोकल सेवांना बसत आहे.

मुंबई येणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाडयांना उशिर येत असल्याने त्या गाडयांना जलद मार्गिका उपलब्ध करून देत असल्याने जलद लोकल सेवांचा वेळापत्रकारवर परिणाम दिसून येत आहे. परिणामी प्रवाशांना नाहक मनस्ताप होत आहे. याशिवाय मेल-एक्स्प्रेससाठी ठाणे-दिवा स्वतंत्र मार्ग उपलब्ध होऊनही लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारला नसल्याचा अनुभव मध्य रेल्वेच्या प्रवाशांना येत आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप जलद लोकल सेवा दुपारी १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागत आहे. यांसंदर्भय रेल्वेला विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर देण्यात आलेले नाही.

उन्हाळ्यात बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उन्हाळी स्पेशल गाड्या सोडल्या आहे. त्याच्या परिणाम उपनगरीय लोकल सेवांचा वेळापत्रकांवर होताना दिसून येत आहे. त्यामुळे सीएसएमटी ते कल्याण पाचवी- सहावी मार्गिका रेल्वेने लवकरात लवकर पूर्ण करावीत. उपनगरीय लोकल सेवेसाठी स्वतंत्र मार्गिका कराव्यात. जेणेकरून लोकल सेवांवर परिणाम होणार नाही.

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष रेल यात्री परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT