mumbai sakal
मुंबई

Mumbai News : लोकल वाहतुकीचे तीन तेरा! हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड

सकाळ डिजिटल टीम

मुंबई, : पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावर तांत्रिक बिघडाच्या घटनेमुळे मंगळवारी सकाळीपासुन लोकल सेवा विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे लोकल सेवांचा वेळापत्रकांवर परिणाम पडला असून प्रवाशांचे प्रचंड हला झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यानची लोकलची वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे मुंबईकरांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला होता

तर, हार्बर मार्गांवर देखील वडाळा रेल्वे सिग्नल बिघाड झाला होता. मंगळवारी सकाळी साडे सात ते आठ वाजण्याच्या सुमारास हा बिघाड झाल्याने सीएसएमटी कडे जाणारी लोकल वाहतुकीचे तीनतेरा वाजले. या बिघाडामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाली होती.

त्यामुळे एकामागेएक लोकल सेवा खोळंबल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी पोहचून काही कालावधीतच हा बिघाडा दुरुस्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT