Liver 
मुंबई

लोकमान्य टिळक रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण होणार

सकाळवृत्तसेवा

मुंबई - केईएमनंतर आता शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी रुग्णालय पातळीवर तयारी सुरू आहे. अवयव प्रत्यारोपणाबाबत झालेल्या जनजागृतीमुळे टिळक रुग्णालयात यासंबंधी शस्त्रक्रियेची माहिती घेण्यासाठी अनेक रुग्ण येतात; मात्र या ठिकाणी यकृत प्रत्यारोपणाची सुविधा नसल्याने त्यांना अन्य रुग्णालयांत जावे लागते. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण सुरू करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.

रुग्णालयाच्या जठरात्र विभागाचे प्रमुख म्हणून डॉ. आकाश शुक्‍ला यांनी नुकतीच जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणासाठी सुमारे 15 ते 20 लाख रुपये खर्च येतो. सरकारी रुग्णालयात हा खर्च सुमारे चार ते पाच लाख रुपये किंवा जास्तीत जास्त 10 लाख येतो. त्यामुळे टिळक रुग्णालयात ही सोय झाल्यास गरीब रुग्णांनाही दिलासा मिळेल.

अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितले की, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. डॉक्‍टरही या शस्त्रक्रियेसाठी उत्सुक आहेत. यासाठी परवानगी मिळविणे आणि अन्य आवश्‍यक बाबींची जुळवाजुळव सुरू आहे. डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी रुग्णालयांव्यतिरिक्त पालिकेच्या केईएम रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची सुविधा आहे. या ठिकाणी 2010 पासून सुमारे 21 रुग्णांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत; तर जानेवारी 2018 पर्यंत या रुग्णालयात 51 जणांनी यकृत प्रत्यारोपणासाठी नोंद केली होती.

शस्त्रक्रियागृहासाठी रुग्णालयातच पर्याय
लोकमान्य टिळक रुग्णालयात सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या परिस्थितीत रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रियागृह मिळण्याची अडचण आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी वापरात असलेले शस्त्रक्रियागृह यकृत प्रत्यारोपणासाठी वापरण्यात येईल असे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt Targets Hospital Bills: खाजगी रुग्णालयांच्या लुटीला ब्रेक? सरकारचा मोठा निर्णय; उपचार खर्च होणार स्वस्त!

जनगणनेतील घरयादीत ३४ प्रश्‍न; काय आहेत प्रश्न, 'या' वेबसाईटवर जाऊन करता येणार जनगणना

महाबळेश्वर ते फिल्मसिटी! कुठे-कुठे झालं 'राजा शिवाजी' सिनेमाचं भव्य शूटिंग?

IPL 2026: राजस्थान रॉयल्सच्या परदेशी खेळाडूवर BCCI कडून मोठी कारवाई; LSG विरुद्ध सामन्यातील चूक पडली महागात

Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकांतर्गत मतदारसंघांची पुनर्रचना करून जागा वाढविण्याचा प्रस्ताव होता; काय म्हणाले मंत्री रामदास आठवले?

SCROLL FOR NEXT