Slum fire sakal
मुंबई

Mumbai News : झोपडपट्ट्यांना आगी कशा लागतात?

मालाड पूर्वेतील आप्पापाडा झोपडपट्टीत सोमवारी लागलेल्या आगीची घटना ही महिन्याभरातील पाचवी घटना आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालाड : मालाड पूर्वेतील आप्पापाडा झोपडपट्टीत सोमवारी लागलेल्या आगीची घटना ही महिन्याभरातील पाचवी घटना आहे. येथील झोपड्यांना नेहमी कशी काय आग लागते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अग्निशमन दलाला येथील आग विझवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

छोट-छोट्या गल्ल्यांमधून घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागली. झोपडपट्टीतील आग विझवण्यासाठी प्रत्यक्ष पोहोचता येत नाही, तेथे आग विझवणारे गोळे किंवा ड्रोनचा वापर आधुनिक काळातही का होत नाही, केवळ गगनचुंबी इमारतींना आग लागल्यावरच त्यांचा वापर करायचा का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

नव्याने सुरुवात...

कोकणातील राजापूर येथील २५ कुटुंबीय स्नेहा वेलफेअर सोसायटीत वास्तव्य करतात. त्यांचा भरलेला संसार अवघ्या काही मिनिटांत डोळ्यासमोर उद्‍ध्वस्त झाला. येथील रहिवासी अनंत तुकाराम घाडी (वय ४६) हे दोन भावांसह येथे राहतात. आतापर्यंत केलेली सर्व जमापुंजी आगीत खाक झाली असून जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचे ते सांगतात. घरातील सर्व साहित्यांसह कागदपत्रेही खाक झाली आहे. येथील प्रत्येक नागरिकांना आता पुन्हा नव्याने संसार उभा करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

-अनंत तुकाराम घाडी

कसे जगायचे तुम्हीच सांगा?

जालना येथील विजय सातपुते हे बी.कॉम पदवीधर असून सध्या ते बेरोजगार आहेत. विजय सध्या नोकरीच्या शोधात असून आई-वडील बिगारीकाम करतात. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो; मात्र या आगीत घरात होते नव्हते, ते सर्व खाक झाले. त्यांच्या कुटुंबात नऊ लोक आहेत. काही क्षणांत चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता पुढे कसे जगायचे, असा सवाल त्यांना सतावत आहे.

-विजय सातपुते

दागिनेही गेले...

आदर्श चाळीतील शकुंतला दत्ता कोळी (वय ७०) या एकट्याच राहतात. आग भडकल्याने शेजाऱ्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांचा जीव वाचला तरी आयुष्याची जमापुंजी म्हणून जमवलेले सोन्याच्या दोन तोळ्यांच्या माळा, कानातील आणि अंगठी जळाले. तसेच आयुष्याची सर्व कमाई, कागदपत्रेही जळून राख झाल्याचे त्यांनी सांगितले.

-शकुंतला दत्ता कोळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT