मुंबई

म्हाडाची कोकण आणि मुंबई मंडळाची सोडत येणार कधी? जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती

तेजस वाघमारे

मुंबई, ता. 5 :  म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत नुकतीच काढण्यात आली आहे. या सोडतीनंतर कोकण मंडळाची सोडत काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरु असल्याचे राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत म्हाडाकडे जमीन नसल्याने मोठ्या विकासकांसोबत संयुक्त भागीदार करून घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हाडा पत्रकार संघाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्ताने म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, मुख्य कार्यकारी योगेश म्हसे, अरुण डोंगरे, मुंबई मंडळाचे माजी सभापती मधु चव्हाण आणि अन्य ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आव्हाड पुढे म्हणाले की, "मध्यमवर्गीयांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा विचार आहे. आज म्हाडाकडे मुंबईत अधिक जमीन उपलब्ध नाही. त्याच्यामुळे जमीन अधिग्रहण आणि गृहसाठा यावर लक्ष्य केंद्रित करून पुढे जाण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. म्हाडाची विश्वासहर्ता मोलाची असून मुंबईत म्हाडाकडील जागांचा साठा कमी झाला आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी मोठ्या विकासकांसोबत संयुक्त भागीदारीत गृहसाठा आणि भूखंड अधिग्रहणातून घरे उपलबध्द केली जाणार", असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

म्हाडातील एकाधिकारशाही मोडीत काढणार

म्हाडात निर्माण झालेली एकाधिकारशाही मोडीत काढणार असल्याचे खडे बोलदेखील आव्हाड यांनी यावेळी सुनावले. एकाच पदावर अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकऱ्यांना इतरांना काहीही समजत नाही, असा भ्रम असतो. म्हाडातील कार्यप्रणाली सुलभ करण्याच्या प्रयत्नास  यश आलेले नाही, अशी खंतही जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. 

विकेंद्रीकरण हवेच

मुंबई पालिकेकडे एकात्मिक प्राधिकरणाचे सर्वाधिकार असावेत, या पुढे आलेल्या मागणीविषयी आव्हाड यांनी विकेंद्रीकरण गरजेचे असल्याचे मत मांडले. याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील, असे आव्हाड म्हणाले. म्हाडा प्राधिकरण कित्येक वर्षापासून कार्यरत असून त्या आधारे अनेक ठिकाणी सामान्यांसाठी वसाहती बांधल्या गेल्याचे उदाहरणही दिले.

mumbai news MHADAs Konkan and Mumbai region draws will be conducted soon jitendra awhad

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Video: काय होतास तू काय झालास तू ? इम्रान खान की आजोबा, पाकच्या माजी पंतप्रधानांचा सोशल मिडीयावरील व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Biotin Rich Food : केस, त्वचा, मधुमेह आणि बरंच काही…; बायोटीनयुक्त पदार्थ खा अन् या आजारांची कायमची सुट्टी करा!

SCROLL FOR NEXT