morarji vora dombivli  sakal
मुंबई

Mumbai News : डोंबिवली मधील टिळक सिनेमागृहाचे मालक मोरारजी विरा यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News : डोंबिवलीकरांच्या मनोरंजनाचा जीवनाचा आविभाज्य घटक म्हणजे टिळक सिनेमागृह. या सिनेमागृहाच्या वीरा बंधूंपैकी जेष्ठ बंधू मोरारजी वीरा (वय 82) यांचे बुधवारी दुःखद निधन झाल आहे.

वीरा कुटुंब डोंबिवलीत चार पिढ्यांपासून राहत आहेत. डोंबिवलीच्या सांस्कृतिक, व्यावसायिक जीवनाशी ते एकरूप झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मोठे भाऊ, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

डोंबिवली शहरात रेल्वे स्थानक परिसरात टिळक सिनेमा गृह आहे. हे सिनेमागृह उभारण्यात मोरारजी यांचा पुढाकार होता. शहरातील हे पहिले सिनेमागृह आहे. या व्यवसायाचा त्यांनी नंतर विस्तार केला. त्यांचे दोन मोठे भाऊ, मोराराजी यांची मुले या विस्तारित व्यवसायाचे काम पाहतात. अतियश संयमित व्यक्तिमत्व म्हणून मोरारजी यांची ओळख होती.

शिवमंदिर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी वर्ग उपस्थित होते. डोंबिवलीकर जगाच्या पाठीवर कुठेही असेल पण टिळक टॉकीजशी अनेकांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. हे तेच टिळक टॉकीज आहे जिथे मराठी सिनेमा रात्री 12 ते 3 हाउसफुल्ल गेल्याचा ऐतिहासिक विक्रम आहे.

मोठ्या बॅनरचा हिंदी सिनेमा न लावता मराठी सिनेमा अग्रक्रमाने मुख्य शोसाठी प्रदर्शित करणारे टॉकीज म्हणून टिळक टॉकीज प्रसिद्ध होते आणि आजही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Municipal Election: अकोला मनपा निवडणुकीत भाजप अव्वल; काँग्रेस, वंचितने साधला गेम, राष्ट्रवादी व शिंदेसेनेला फाजील आत्मविश्वास नडला!

नात्याला काळीमा फासणारी घटना! होमगार्ड मावसाचा मुलीवर अत्याचार; बाळापूर तालुक्यात खळबळ, 'ती' कायमच घाबरलेली..

Advocate Shriram Pingale : नाशिक महापालिकेची नोटीस वादाच्या भोवऱ्यात! ॲड. श्रीराम पिंगळे यांचा वृक्षतोडीला तीव्र विरोध

पुण्यात महापौरपदासाठी दावेदारांचं गुडघ्याला बाशिंग, आरक्षणाची चिठ्ठी कुणाला कौल देणार?

Local Megablock: पुढील काही तास मुंबईकरांचे होणार हाल! मेगाब्लॉकमुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडणार; तब्बल १२० फेऱ्या रद्द राहणार

SCROLL FOR NEXT