मुंबई

कंत्राटी कामगार पुन्हा विद्यापीठाच्या सेवेत 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - दिवाळीच्या आधी सोमवारी (ता.16) मुंबई विद्यापीठाने 163 कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेतले. जून महिन्यात कंत्राट संपल्यानंतर विद्यापीठाने तब्बल 470 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले होते. 

तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील या कामगारांना विद्यापीठाने कालपासून रुजू करून घेतल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कंत्राटी कामगारांना काढल्याने काही महिन्यांपासून विद्यापीठातील कामकाजावरही परिणाम झाला होता. निकालांच्या गोंधळात मनुष्यबळ कमी पडले होते. तीन महिन्यांपासून विद्यापीठातील इतर कामकाजावरही याचा परिणाम दिसत होता. त्यामुळे कंत्राटी कामगारांना परत घेण्याबाबत व्यवस्थापकीय परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यावर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित कंत्राटी कामगारांनाही कामावर घेतले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन, दोन मुलींना दिलं विष

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

SCROLL FOR NEXT