Crime News 
मुंबई

Mumbai News : हत्या करून आत्महत्येचा बनाव...! पोलिसांकडून दोघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीची हत्या करून त्याने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या दोघांना टिळक नगर पोलिसांनी गुरूवारी अटक केली.गौतम बोराडे आणि अफजल शेख असे अटक आरोपींचे नाव आहे.

टिळक नगर पोलिसांना चेंबूरमधील पेस्तम सागर रोड परिसरात 19 जून रोजी एक अनोळखी व्यक्ती झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. मात्र दोन दिवसांपूर्वी या इसमाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना उपलब्ध झाला.

या व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमुद करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.या परिसरात राहणारा गौतम बोराडे आणि अफजल शेख यांनी या अनोळखी व्यक्तीला मारहाण केल्याचे उघड झाले.

त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. मृत्यू झालेल्या व्यक्तीने शिवीगाळ केल्याने त्याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने भीतीपोटी त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT