Crime News 
मुंबई

Crime News: डोंबिवलीत नवरात्र उत्सवाला गालबोट; देवीच्या उत्सवादरम्यान आयरे रोडवर दोन गटात राडा

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

मुंबई- डोंबिवली पूर्व येथील जुना रोड परिसरातील गावदेवी मंदिर येथे नवरात्र उत्सव सुरू असताना दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. जय अंबिका भक्त मंडळ आयरे गाव येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून ती मारामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

50 ते 60 जणांचा मॉब अचानक एकमेकांशी भिडल्याने दर्शनासाठी आलेले भाविक भयभीत होऊन इतरत्र पळत सुटले. काय झाले हे समजण्याच्या आताच काही तरुण आपापसात भिडले. दगडांनी व चोपरने एकमेकांवर वार करण्यात आल्याचं कळतंय. या हाणामारीत चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येताच तरुणांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत हाणामारी करणाऱ्या तरुणांचा शोध सुरू करत तपास सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी दोन गटामध्ये राडा झाला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT