Varsha Gaikwad  sakal
मुंबई

Mumbai News : नालेसफाई नव्हे तर निव्वळ 'हाथ की सफाई'; वर्षा गायकवाड यांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मान्सूनपूर्व १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा सत्ताधारी आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन करत आहे. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांत नालेसफाईची कामे झालीच नाहीत. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास मुंबई तुंबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नालेसफाईत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यांनी आज मुंबईतील काही भागातील नालेसफाईच्य़ा कामांची पाहणी केली.

वर्षा गायकवाड यांनी धारावी येथील ६० फिट रोड, प्रेम नगर आणि शेठ नगर या परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यात अनेक ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा अजून त्याच ठिकाणी पडून असल्याचे आढळले. काही भागात तर नालेसफाई झालीच नसल्याचे दिसून आले. मुंबईच्या अनेक भागांत हे चित्र पहायला मिळत आहे असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई करा

मुंबई महापालिकेने रुपये २२६ कोटी खर्च करून पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात सत्ताधारी, महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये भ्रष्टाचार होऊन निव्वळ 'हाथ की सफाई' झालेली आहे, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. नालेसफाईच्या कामातील घोटाळ्याची तातडीने चौकशी करून सर्व दोषींवर कडक कारवाई व्हावी. तसेच ज्या भागाच्या नालेसफाईची कामे अजूनही झालेली नाहीत, ती ताबडतोब करावीत, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

Dr Babasaheb Ambedkar : 'या' मोठ्या घटनेनंतर डॉ. आंबेडकरांनी दिली होती रायगडाला ऐतिहासिक भेट, एक दिवस केला होता मुक्काम

"कॅन्सरचे उपचार सुरु असतानाही त्याने.." मराठी अभिनेत्याने उघड केली रमेश भाटकरांची अखेरची इच्छा; म्हणाले..

Leopard Entered Muktainagar : अवघ्या 5 फुटांवरून बिबट्यावर डागले दोन अचूक 'डॉट'; हातात काठी घेऊन स्वतः आमदार मैदानात, मुक्ताईनगरमध्ये बिबट्याला कसं पकडलं?

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

SCROLL FOR NEXT