मुंबई

पॉर्न व्हिडीओ प्रकरणात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा; बड्या उद्योगपतीचाही प्रकरणाशी संबंध

अनिश पाटील

मुंबई, ता.13 : गुन्हे शाखेने पर्दाफाश केलेल्या पॉर्न व्हिडीओ प्रकरणात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा होत असुन, याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींनी आतापर्यंत 50 हून अधिक पाॅर्न व्हिडीओचे शुटींग केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी परदेशातून अर्थपुरवठा करण्यात आला आहे. याप्रकरणी एक उद्योगपती रडावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रत्येक व्हिडिओसाठी अभिनेत्री गहना वशिष्ठला दोन ते तीन लाख रुपये मिळत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 9 हून  अधिक जणाना अटक करण्यात आली असुन, अनेकांची याबाबत कसुन चौकशी सुरु आहे. याआधी पोलिसांनी पॉर्न फिल्म बनवणाऱ्या एका प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश केला होता. ही कंपनी स्ट्रगलिंग कलाकारांकडून शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचे ऍग्रिमेंट करून न्यूड शूट करून घेत असत. तसेच नकार दिल्यास केस करण्याची धमकी देत असे.

फिल्म प्रॉडक्शन कंपनीने एक मोबाईल ऍपही बनवलं आहे. यावर ते आपल्या पाॅर्न फिल्म अपलोड करत असत. या ऍपसाठी  2 हजार रुपये सबस्क्रीप्शन फी घ्यायचे. पोलिसांनी याप्रकरणी 6 मोबाईल फोन, एक लॅपटाॅप, लाईट स्टॅण्ड, कॅमे-यांसहितपाच 5 लाख 68 हजारांचे सामान जप्त केले आहे. या कारवाईत पॉर्न साईट आणि मोबाइल ऍपच्या माध्यमातून अश्लील चित्रफितींचा व्यवसाय करणाऱ्या दोन अभिनेत्यांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती.

यामध्ये अभिनेत्रीसह दोन अभिनेता, एक ग्राफिक डिझायनर महिला, फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांना समावेश आहे. अभिनयाची आवड असलेले अनेक तरुण आणि तरुणी मुंबईत येत असतात. अभिनय क्षेत्रात संधी मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. याच परिस्थितीचा पुरेपूर फायदा बॉलिवूडशी संबंधित काही मंडळी घेत असून उपनगरात बंगले भाड्याने घेऊन त्यांच्या अश्लील व्हिडीओ बनवले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली.

प्रभारी पोलिस निरीक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कक्षाच्या पथकाने मढ बीचवरील ग्रीन पार्क बंगल्यात छापा टाकला. यावेळी एका अश्लील व्हिडिओचं शूटिंग सुरु होते. याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यातही नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

mumbai news obscene video shooting case many important points reviled during investigation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT