Fire  esakal
मुंबई

Mumbai News : लग्नासाठी जमवलेली जमापुंजी आगीत खाक

शेकडो झोपड्यांना लागलेल्या आगीमध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील मालाड पूर्वेला आप्पापाडा येथे शेकडो झोपड्यांना लागलेल्या आगीमध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. परंतु आगीच्या घटनेत अनेक संसार कोलमडून पडले आहेत.

आगीची झळ बसलेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे विजय कांबळे यांनाही आगीच्या घटनेमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आपल्या पुतणीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे आगीत खाक झाले. अनेक स्वप्नांची राखरांगोळी या आगीच्या घटनेमुळे झाल्याचे कांबळे यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांपासून एक एक असा पैसा जोडत आम्ही पुतणीच्या लग्नासाठी सव्वा लाख रूपये जमवले होते. येत्या मे महिन्यातील लग्नासाठी कॅटरर्स आणि हॉलचे पैसे देण्यासाठी ही रक्कम घरात ठेवली होती; पण त्याआधीच काळाने आमच्यासमोरील आव्हान आणखी कठीण करून ठेवले आहे.

आगीचा भडका इतका मोठा होता की फक्त मुलाला घाईने घेऊन मी बाहेर पडलो. त्यामुळे इतर काहीच घेता आले नाही. त्यामध्ये कपाटात ठेवलेले सव्वा लाख रूपयेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, अशी भावना कांबळे यांनी बोलून दाखवली.

आमच्या घराच्या जळाल्याच्या ठिकाणाचे सर्वेक्षण वन विभाग आणि स्थानिक पोलिसांकडून झाले आहे; पण त्यापलीकडे कोणतीही मदत आम्हाला मिळालेली नाही. काही दिवसांवर आलेल्या लग्नासाठी पुन्हा एकदा पैसा कसा जमा करायचा, हा मोठा प्रश्न आमच्यापुढे असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT