Mumbai News sakal
मुंबई

Mumbai News: मुंबईत मराठीच चालणार! भर चौकात असलेली गुजराती पाटी उतरवली

Chinmay Jagtap

Mumbai News: दोन दिवसांपासून घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या एका चौकाच्या पुलावर ‘मारू घाटकोपर’ अशी गुजराती भाषेत लिहिलेली पाटी चर्चेत आली. त्याचा निषेध करत शनिवारी (ता. ७) रात्री शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ती तोडून तिथे मराठीत ‘माझं घाटकोपर’ अशी पाटी लावली.

यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईच्या उपनगरात घाटकोपर, मुलुंड, बोरिवली आदी ठिकाणी गुजराती वस्ती मोठ्या संख्येने आहे. अशा वस्त्यांमध्ये मराठी माणसाची मुस्कटदाबी होण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

मुलुंडमधील एका गुजराती सोसायटीमध्ये तृप्ती देवरूखकर यांना कार्यालयासाठी जागा नाकारल्यानंतर मराठी विरुद्ध गुजराती वाद चांगलाच चिघळला. त्यानंतर आता घाटकोपरच्या घटनेनंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे विभागप्रमुख सुरेश पाटील यांनी संबंधित प्रकरणी शिवसैनिकांचे आभार मानले आहेत.

‘मुंबईचे अशा छुप्या पद्धतीने होणारे गुजरातीकरण सहन करायला आम्ही नकली शिवसैनिक नाही,’ असा टोलाही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टद्वारे मारला आहे. गुजराती भाषेतील पाटी ज्यांनी तोडली त्यांचा शिवसैनिक म्हणून आम्हाला अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आम्ही मुंबईचे गुजरात होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ‘मारू घाटकोपर’ अशी गुजराती भाषेत लिहिलेली पाटी तोडून तिथे मराठी फलक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सेनेकडून लावण्यात आल्यानंतर आज दिवसभर त्याचीच चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT