mhada Sakal
मुंबई

Mumbai Mhada: जुन्या आणि मोडकळीला आलेल्या म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News: राज्य सरकारने म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाबाबत प्रस्तावित फेरबदल असलेला शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यामुळे मुंबईतील ३८८ जुन्या आणि मोडकळीला आलेल्या म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे येथील रहिवाशांना सरसकट किमान ४०५ चौरस फुटांचे घर मिळणार आहे.

शिवसेनेने केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरण सरकारने विकास नियंत्रण नियमावली ३३ (२४) नुसार जाहीर केले, मात्र या धोरणानुसार देण्यात आलेला प्रोत्साहनपर एफएसआय आणि इतर सवलती कमी असल्याने कोणीही विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नव्हता.

सरकारच्या धोरणामुळे हा प्रश्न निकाली निघत नव्हता. त्यामुळे या ३३ (२४) धोरणामध्ये विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) प्रमाणे सवलती द्या, अशी मागणी होती. शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर २०१८ मध्‍ये विधानसभेत सरकारकडून म्हाडा पुनर्विकास धोरणाबाबत आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. शिवसेनेने सातत्याने हा विषय लावून धरला होता.

३८८ इमारती

३८ हजार कुटुंबांचे वास्‍तव्‍य

१६० ते २१५ चौरस फुटांची घरे

रहिवाशांना दिलासा

नव्या जीआरमुळे रहिवाशांना फायदा होणार आहे. रहिवाशांना आणि भाडेकरूंना किमान ४०५ चौरस फुटांचे घर मालकी हक्काने मिळणार आहे. विकसकाला प्रोत्साहनपर एफएसआय दिल्यामुळे इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच ३० वर्षे पूर्ण झालेल्या म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या इमारतींचा पुनर्विकास शक्य होणार आहे. यासाठी ५१ टक्के रहिवासी भाडेकरू एकत्र येण्याची अट असून ते एकत्र आल्यास पुनर्विकास शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT