मुंबई

अभिनेत्री सनी लिओनीला नियम न मोडता ई-चलान, तक्रार केल्यानंतर धक्कादायक प्रकार पुढे

अनिश पाटील

मुंबई, ता.25ः वाहतूक नियमांपासून वाचण्यासाठी अनेकजण दुसऱ्याच्या गाडीचा नंबर वापरत असल्याचे विविध कारवायांमधून पुढे आले आहे. नुकतीच अभिनेत्री सनी लिओनीच्या कारचा क्रमांक दुसऱ्या कारवर वापरल्यामुळे तिला नाहक त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी हिच्या कारच्या नंबर प्लेटचा वापर दुसऱ्याच कोणीतरी करत होता. ज्यावेळी वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी सनीला वाहतूक पोलिस शाखेकडून वारंवार ई-चलन पाठविण्यात आले. त्यावेळी सनी आश्चर्य वाटले.

ज्या मार्गावरून आपली गाडी गेलीच नाही. त्या मार्गावरील सीसीटिव्हीत हुबेहुब आपली गाडी दिसतेच कशी, अशा प्रश्न नियम न मोडता ई चलन आले कसे, हा प्रश्न सनीला पडला. पहिल्यांदा तिने दुर्लक्ष केलं, मात्र एका मागोमाग एक दोन ते तीन  चलान आल्यानंतर मात्र सनीने हे प्रकरणं गांभीर्याने घेतलं. विविध ठिकाणी आपली गाडी गेली नसताना सीसीटिव्हीत हुबेहुब आपल्या सारखी गाडी आणि तिचा नंबर लावून चलन येत असल्यामुळे ती त्रस्त झाली होती. याची माहिती सनीने पती डेनल वेबर याला दिली. गाडीही डेनलच्या नावावर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याने आपल्या चालकाला याबाबत डी.एन.नगर वाहतूक पोलिसात चौकशी करण्यास सांगितली. त्यानंतर त्याने वरळीच्या वाहतूक शाखेकडे ही तक्रार केली.

दरम्यान सन्नी लिओनी यांचा चालक अंकुश निरभवने याला सनी यांच्यासारखी बीएमडब्ल्यू कार वर्सोवाच्या कोकीलाबेन वीरूभाई अंबानी रुग्णालयासमोर अच्युतराव पटवर्धन मार्गावर उभी दिसली. हे पाहिल्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांना घटनास्थळी बोलावले. एकाच रंगाच्या आणि हुबेहुब दिसणारी गाडी आणि नंबरही सारखाच असल्याचे पाहून पोलिस ही थबकले. त्यानुसार पोलिसांनी संबधित गाडी चालकाकडे गाडीची कागदपत्रे मागितली. तर दुसरीकडे सनीच्या पतीने त्यांच्या गाडीचे कागदपत्रे आणून पोलिसांना दाखवली. खरी खुरी गाडी कोणती याचा न्याय निवाडा लागल्यानंतर,  सनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

याप्रकरणी आता जुहू पोलिसांनी त्या गाडीचा चालक पियुष सेन याला फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. सप्टेंबर 2020 पासून तो ही खोटी नंबर प्लेट आणि हुबेहुब कार चालवत असल्याचे तपासात निर्देशन आले. आपल्या गुन्ह्यांची कबूली आरोपीने दिली आहे.

खात्री न करता आपण दुसऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाडीची नंबरप्लेट लावून फिरतोय, याचे भान  आरोपी पियुषला पडले नव्हते. याआधी उद्योगपती रतन टाटा यांनाही अशा घटनेचा सामना करावा लागला होता.

वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी टाटा यांना वाहतूक पोलिस  शाखेकडून ई चलन पाठविण्यात आले. त्यावेळी टाटा यांनाही आश्चर्य वाटले. नियम न मोडता ई-चलन आले कसे, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी वाहतूक शाखेकडे तक्रार केली. त्यावेळी धक्कादायक माहिती पुढे आली. रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर एक महिला आपल्या कारवर लावून चालवत होती.

mumbai news piyush sen held for using number plate of sunny leones BMW car

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

आजचे राशिभविष्य - 22 मार्च 2026

Sopara Buddhist Stupa : सोपारा बौद्ध स्तूप; इतिहासाच्या कुशीत लपलेलं महाराष्ट्राचं अनमोल ठेवं

मेष राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - व्यवसायात तेजी, पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक

SCROLL FOR NEXT