Mumbai News  
मुंबई

Mumbai News : पावसाळ्याची तयारी! पुराच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी ४७७ पंप सज्ज

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - अतिवृष्टीच्या काळात पुर आल्यास त्याचा उपसा करणारे एकूण ४७७ पंप मुंबई शहर तसेच उपनगरांमध्ये लावण्यात आले आहेत. मुंबईतील सखल भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी या पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाणी तुबल्यास आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी तसे आदेश दिले होते. त्यानुसार पालिका क्षेत्रात पाणी साचणाऱया विविध ठिकाणी मिळून ४७७ पंप लावण्याचे काम पर्जन्य जलवाहिन्या विभागाने पूर्ण केले आहेत.

पावसाळ्याच्या कालावधीत दैनंदिन कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व कामांचा परिणाम येत्या पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना परिणामकारक स्वरुपात दिसून येईल, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सांगितले.

कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या सूचनाही वरिष्ठ प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सखल भागात २४ तास पंप सज्ज राहतील, हीदेखील जबाबदारी समन्वय अधिकाऱ्यांवर असणार आहे.

पंप कोणत्या भागात

मुंबईतील सखल भागात पाणी उपसा करणाऱया पंपांमध्ये शहर भागात एकूण १८७ पंप आहेत. पश्चिम उपनगरामध्ये एकूण १६६ पंप आणि पूर्व उपनगरामध्ये एकूण १२४ पंप आहेत. शहर भागात कुलाबा विभागात सर्वाधिक २५ पंप आहेत. तर पश्चिम उपनगरात एफ दक्षिण विभागात ३२, एफ पूर्व विभागात ४७ पंप आहेत. तर पश्चिम उपनगरामध्ये एच पूर्व विभागात ५५ पंप आणि एच पश्चिम विभागात २४ पंप आहेत. तर पूर्व उपनगरात विभागात ४८ पंप आणि एम पश्चिम विभागात २१ पंप आहेत.

समन्वय अधिकारी हे आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील समन्वयकाकडे या पंपच्या कामगिरीची माहिती वेळोवेळी देणार आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पंपांनी किती तास पाणी उपसा केला यावर लक्ष ठेवणे देखील शक्य होणार आहे,

- उल्हास महाले, उप आयुक्त (पायाभूत सुविधा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील महापूर, अतिवृष्टीने बाधितांसाठी ७७२ कोटी, आजपासून पैसे खात्यात जमा होणार..

IND vs AUS 1st ODI Live: रोहित शर्माचा भारी विक्रम, विराटलाही संधी; भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूचे पदार्पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

Latest Marathi News Live Update : कर्मभूमी एक्सप्रेसमधून पडून दोघांचा मृत्यू, नाशिक रोडजवळ घडली घटना

Konkan Railway : कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांना दिवाळी भेट, लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबणार

IND vs AUS 1st ODI : रोहित शर्मा-विराट कोहली यांच्या भवितव्याची नवी पहाट; वन डे मालिका स्वतःला सिद्ध करणारी

SCROLL FOR NEXT