anabhau sathe sakal
मुंबई

Mumbai News : अण्णा भाऊ साठेंच्या ग्रंथांचे गुरुवारी प्रकाशन; राजभवनानेच घेतला पुढाकार; तीन महिने झाला विलंब

राजभवन कार्यालयाने लोकशाहिरांच्या चार खंडांचे प्रकाशन तीन महिन्यांहून अधिक काळ कसे

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समितीने तयार केलेल्या चार खंडांच्या प्रकाशनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. अण्णा भाऊ यांच्या कथा, कादंबरी आदी साहित्य प्रकाराचा समावेश असलेल्या चार खंडांचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे गुरुवारी (ता.९) दुपारी ४ वाजता होणार असल्याचे शुक्रवारी राजभवनाकडून जाहीर करण्यात आले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे चार खंड प्रकाशनासाठी मागील तीन महिन्यांहून अधिक काळ तयार होते; मात्र त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि त्यांच्या कार्यालयाला वेळ मिळत नव्हता. यामुळे ‘सकाळ’ने वेळोवेळी यासंबंधी वृत्त दिले होते. २५ ऑक्टोबर रोजी ‘लोकशाहीरांच्या ग्रंथ प्रकाशनाला वेळ मिळेना’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची गंभीर दखल उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतली; मात्र त्यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा केला जात नव्हता.

राजभवन कार्यालयाने लोकशाहिरांच्या चार खंडांचे प्रकाशन तीन महिन्यांहून अधिक काळ कसे थांबले, याची माहिती घेऊन यासाठी तत्काळ कार्यवाही सुरू केली. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला अनेकदा वेळही दिला होता; मात्र त्यानंतरही विभागाने नियोजन न केल्याने शेवटी राजभवन कार्यालयानेच ९ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करून अण्णा भाऊ साठे यांच्या चार खंडांचे प्रकाशन राजभवनातील मुख्य सभागृहात घेण्याचे जाहीर केले. समितीच्या सचिवांसह उच्च व तंत्र शिक्षण विभागालाही याची माहिती देण्यात आली आहे.

अशी झाली रखडपट्टी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समितीने २५ जुलै रोजी उच्च शिक्षण विभागाच्या पुण्यातील संचालकांकडे ‍अण्णा भाऊंच्या कादंबरीवरील आधारित तीन खंड आणि कथांवरील आधारित एक अशा चार खंडांच्या आठ भागांचे ग्रंथ प्रकाशनासाठी पूर्ण करून ते सादर केले होते

चार खंडांचे प्रकाशन हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १ ऑगस्ट २०२३ रोजी १०३ व्या जयंतीदिनी पुण्यात करण्याचे नियोजन ठरले होते; मात्र ते पुढे ढकलण्यात आले

विभागाने पुढील १५ दिवसांत मुंबईतच प्रकाशन करण्याचे जाहीर केले; मात्र त्यासाठी योग्य पाठपुरावाच केला नसल्याने प्रकाशन तीन महिन्यांपासून रखडले

चार खंडांचे प्रकाशन करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि त्यांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी दिरंगाई झाल्याने प्रकाशन रखडल्याची साहित्यिकांची खंतc

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT