MNS 
मुंबई

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या संघटनात्मक फेरबदलाच्या बैठकांचे नियोजित वेळापत्रक पूर्ण होण्यापूर्वीच पक्षातील बड्या नेत्यांना झटके देण्यास सुरुवात केली असून त्यांनी भायखळा आणि शिवडी या विभागांच्या विभागाध्यक्षपदावरून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या समर्थकांची उचलबांगडी करत नव्या विभागाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या.

विशेष म्हणजे भायखळा विभागात तर नांदगावकरांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या संजय नाईक यांचीच वर्णी लावत राज यांनी नांदगावकर गटाला जोरदार झटका दिल्याचं बोलले जात आहे.

राज ठाकरे आणि मनसे सैनिकांमध्ये थेट संवाद होत नसल्याची ओरड संघटनेत पूर्वीपासून होती. ही उणीव भरून काढण्याचा निश्चय सध्या राज ठाकरे यांनी केलेला आहे. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी संवाद बैठकांचे आयोजन मनसेने सुरू केले आहे. आतापर्यंत १५ विधानसभा क्षेत्रामध्ये या बैठका झाल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या बैठका चालणार आहेत. दरम्यान 16 जूनला मनसेतर्फे एक पत्र जारी करण्यात आले होते. पत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अंगीकृत संघटना असलेल्या कामगार सेना, वाहतूक सेना, लॉटरी सेना, जनाधिकार सेना, स्वयं रोजगार संघटना या संघटनांमधील पदाधिकाऱ्यांची पदं बरखास्त करण्यात येत आहेत. तसेच या पदांचा गैरवापर केल्यास पक्षातर्फे कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT