Kishori Pednekar Sakal
मुंबई

Mumbai News : कुठल्याही चौकशीला तयार! माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची भूमिका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - महापौर हे वैधानिक पद असल्यामुळे कोरोना काळात विशेष अधिकार असलेल्या प्रशासनाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आली आहे. आपल्यावर नाहक आरोप करण्यात येत असून शिवसेनेच्या बदनामीचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास माझी तयार असल्याचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

कोरोना काळात मुंबईतील अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी महापौर पेडणेकर यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह मुंबई मनपाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व आताचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांची झडती घेण्यात आली. शिवसेनेची कोंडी करण्याच हा प्रकार आहे. असे माजी महापौर पेडणेकर म्हणाल्या.

महापौरपद हे वैधानिक पद आहे. कोरोना काळात विशेष अधिकारी प्रशानाला होते. त्यामाध्यमातून खरेदी झाली. त्यामुळे मला आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून माझी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयारी आहे. असे माजी महापौर पेडणेकर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT