Mumbai News 
मुंबई

Mumbai News : कामगारांच्या कुटुंबांना दिलासा! अंधेरीतील कामगार रुग्णालय पुन्हा सुरू होणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - अंधेरी ( पूर्व) एमआयडीसी येथील कामगार रुग्णालयाय पुन्हा सुरू होणार आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी ओपीडी सुरू होणार असल्याने कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

कामगार रुग्णालयाला १७ डिसेंबर २०१८ ला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता आणि १५० जण जखमी झाले. आग लागण्यापूर्वी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या या रुग्णालयात ओपीडी, ३५० बेड्स,आयसीयू आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरु होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओल़ॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटसह सर्व सोयी सुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते.

ओपीडी विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते, ब्ल़ड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कामगार अंधेरीच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी येत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या.

केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी हु रुग्णालय सुरू होण्यासाठी जातीने लक्ष घातले. रुग्णालयाचे काम सुरू करण्यासाठी नॅशनल बिल्डिंग्स कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) सोबत आढावा बैठका घेतल्या. या विषयावर चर्चा करण्यासाठी अलीकडेच महासंचालक ईएसआयसी आणि एनबीसीसीचे संचालक यांची बैठक झाली.

त्यानंतर ओपीडीचे काम तीन महिन्यांत कामे पूर्ण केले आहे. औपीडी सुरू झाल्याने कामगारांना चांगलाच दिलासा मिळाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांनी दिली.

या रुग्णालयाच्या इमारतिच्या 'ए' आणि 'ई' विंगच्या तळापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत ओपीडीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पीजी रुग्णालय आणि कर्मचारी निवासमधील ही काही दुरुस्ती करण्यात आले आहे. तसेच ओटी ब्लॉक ,बेसमेंट व तळमजला पासून पाचव्या मजला आणि आयपीडी ब्लॉक बेसमेंट व तळमजला पासून सातवा मजलाचे स्ट्रक्चरचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुतुला यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT