मुंबई

बँक ऑफ महाराष्ट्राच्या खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; एम्प्लॉईज फेडरेशनच्या जनरल सेक्रेटरींनी काढलंय पत्रक

कृष्ण जोशी

मुंबई, ता. 16 : खासगीकरणाच्या यादीत महाराष्ट्रातील लोकप्रीय बँक ऑफ महाराष्ट्रचे नाव आणणे हा खोडसाळपणा आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात कोणतेही विधान केले नसल्याने नागरिकांनी ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेऊ नये. या बँकेचे सार्वजनिक स्वरूप कायम राहण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे विधान बँक कर्मचारी संघटनांनी केले आहे. 

ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी एका पत्रकाद्वारे वरील विधान केले आहे. महाबँकेतील सर्व संघटना बँकेच्या भल्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. बँक ऑफ महाराष्ट्र चे सार्वजनिक स्वरुप अबाधित रहावे यासाठी या संघटनांतर्फे सर्व प्रयत्न केले जातील. ही बँक सामान्य माणसांची असून तिचे ते स्थान अढळ रहावे असाच आमचा प्रयत्न राहील, असेही पत्रकात म्हटले आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्र चे खासगीकरण होणार असल्याचे अनेक बातम्यांमधून सूचित करण्यात येत आहे. मात्र या बातम्यांना कोणताही वस्तुस्थितीचा आधार नाही. सरकारने यासंदर्भात कोणतेही विधान केले नसल्याने या बँकेचे नाव घेणे हा खोडसाळपणा आहे. मात्र यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. सामान्य माणसांची बँक असलेली बँक ऑफ महाराष्ट्र ही नफ्यातील बँक असून ती सर्व वित्तीय निकषांवर उत्कृष्ट काम करीत असल्याचा दिलासा पत्रकात देण्यात आला आहे. 

येस बँक, पीएमसी बँक आदी बँकांच्या अनुभवानंतर नुकतेच रिझर्व्ह बँकेने अनेक सहकारी बँकांवर निर्बंध लादल्याने सामान्यांचा बँकिंग क्षेत्रावरचा विश्वास उडाला आहे. हा विश्वास पुन्हा यावा यासाठी रिझर्व्ह बँकेनेच पुढे येऊन वस्तुस्थिती मांडावी, असे आवाहनही संघटनेने केले आहे. अशा स्थितीत नागरिकांनी ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेऊ नये. या बातम्यांचा आधार घेऊन शेअर बाजारात काही दलाल वारेमाप नफा कमावीत आहेत. यासंदर्भात सेबी ने देखील हस्तक्षेप करून स्पष्टीकरण द्यायला हवे होते, असेही पत्रकात म्हटले आहे.

mumbai news ridiculous to include Bank of Maharashtra in the list of privatization

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

Mumbai News: कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल; केंद्राला भूमिका स्पष्‍ट करण्याचे आदेश

IPL 2026 Auction: वेंकटेश अय्यरची किंमत तब्बल १६.७५ कोटींनी झाली कमी! माजी विजेत्यांनी केलं खरेदी

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : विहीरीत पडलेल्या हरणास शेतकऱ्यांनी दिले जीवदान

SCROLL FOR NEXT