Vasai to Bhayandar can be traveled by boat  sakal
मुंबई

Mumbai News: आता वसई ते भाईंदर करता येणार बोटीने प्रवास

Vasai News: मंगळवारपासून रोरो बोट प्रवाशांचा सेवेत दाखल; महाराष्ट्र सागरी महामंडळाची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान सध्या 'प्रायोगिक तत्त्वावर' रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा २० फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात येत आहे.

ह्या रोरो बोटीचे सुरक्षित व सुलभ नौकानयन, जेट्टी व बोटीमधून प्रवासी आणि वाहनांची सुलभ चढ-उत्तार आणि सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर, ह्या फेरीबोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरित्या करण्यात येणार आहे.

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ह्या रो-रो फेरीबोट सेवेमुळे भाईंदर आणि वसई ही शहरे एकमेकांशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत.

मेसर्स सुवर्णदुर्ग शिपींग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीस ही रो-रो फेरीबोट सेवा चालविण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली असून, एकाच फेरीत १०० प्रवासी आणि ३३ गाड्या वाहून नेण्याची फेरीबोटीची क्षमता आहे.

ह्या कंपनीला कोकण किनारपट्टीवर राजपुरी, बाणकोट, दाभोळ आणि जयगड या खाड्यांमध्ये रो-रो फेरीबोट सेवा चालविण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. वसई ते भाईंदर या फेरीबोट सेवेकरिता सध्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर पुढीलप्रमाणे तिकीट दर ठेवण्यात आले आहेत.

असे आहे तिकीट दर

मोटारसायकल - रु. ६०/-

तीन चाकी रिक्षा - रु. १००/-

चारचाकी वाहन - रु. १८०/-

प्रवासी प्रौढ (१२ वर्षावरील) - रु. ३०/-

प्रवासी लहान - रु. १५ /-

सध्या ही फेरीबोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरु होणार असली तरी, वाहतूककोंडीचा सामना करीत वसई ते भाईंदर असा रस्त्याने प्रवास करणा-या लोकांना वेळ व इंधनाची बचत करणारा, प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही व आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने जनतेसाठी ही सेवा नक्कीच दिलासादायक ठरेल-

- डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई.

अशी असणार बोट-

या रोरो बोटीची वाहन क्षमता ५० दुचाकी, ३० चारचाकी वाहनांची असणार आहे. तसेच प्रवासी क्षमता १०० पेक्षा जास्त असणार आहे. या मिनी रोरो बोटीची किंमत ६.२ कोटी रुपयांची असून कंपनीने रोरो बोटीला जान्हवी असे नाव ठेवण्यात आले आहे.

५० मिनिट वाचणार

वसई ते भाईंदर सकाळी व गर्दीच्यावेळी येताना वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वसई ते भाईंदर रस्ते मार्गे साधारण ३८.२० किलोमीटर आहे. वाहनांना रस्ते मार्गाने हे अंतर पार करण्यासाठी सव्वा तास ते दीड तास कालावधी लागतोय. मात्र, आता जलद मार्गाने हे अंतर अवघ्या ३.५७ किलोमीटर येणार आहे. त्यामुळे रोरो बोटीतून आपले वाहन घेऊन अवघ्या १५ मिनिटात प्रवाशांना वसई ते भाईंदर गाठता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: एनसीईआरटीचा धडा वादाच्या भोवऱ्यात! न्यायिक भ्रष्टाचार प्रकरणावर सरन्यायाधीशांचा थेट इशारा!

Viral News : आजोबांनी इंग्रजांना दिले होते ३५००० रुपयांचे कर्ज, नातू १०९ वर्षांनंतर करणार कोट्यवधी वसूल, ब्रिटिश सरकारला पाठवणार नोटीस

'परदेसी..' गाण्यामुळे झाली सुपरस्टार, संगीतकाराबरोबर अफेअर आणि आईचा विरोध; आता काय करते ही अभिनेत्री?

Sun on Earth : 100,000,000°C ची उष्णता! चक्क पृथ्वीवर 'सूर्य' बनवतायत बिल गेट्स, जगभर चर्चेत असलेला 'Infinity One' प्रोजेक्ट काय आहे?

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

SCROLL FOR NEXT