मुंबई

देवनार क्षेपणभूमीला सुरक्षा कवच 

मंगेश सौंदाळकर

मुंबई - महापालिकेच्या देवनार येथील क्षेपणभूमीत आता 24 तास सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. पोलिस चौक्‍या, नियंत्रण कक्ष, वॉच टॉवरसह हायमास्ट दिवेही बसवले जाणार आहेत. महिला पोलिसांकरिताही तेथे स्वतंत्र व्यवस्था तयार केली जाईल. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या सूचनांवर पालिकेने तत्काळ कारवाईला सुरुवात केली आहे. 

सुमारे 120 हेक्‍टरवरील या क्षेपणभूमीत कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. गतवर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या. त्यामुळे मुंबईकरांना धुराचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. दुर्घटनांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यानी मुंबई पोलिसांना दिले होते. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज लोहिया यांच्याकडे तपास सोपवण्यात आला होता. पोलिसांनी 150 जणांचे जबाब नोंदवले. घटनास्थळाहून जप्त केलेले नमुने न्यायसहाय्यक प्रयोगशाळेत पाठवले होते. एप्रिलमध्ये शिवाजीनगर पोलिसांनी तपास करून नऊ जणांना अटक केली होती. आरोपींच्या सांगण्यावरून काही जण रात्री किंवा पहाटे कचरा जाळत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. 

देवनार क्षेपणभूमीबाबत उच्चस्तरीय नियंत्रण समिती नेमण्यात आली होती. नुकतेच गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी देवनार क्षेपणभूमीला भेट दिली. त्या वेळी पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. तेव्हा पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रसामुग्रीची मागणी केली. क्षेपणभूमीत पोलिसांकरिता चौक्‍या आहेत. मात्र त्या छोट्या आहेत. त्यामुळे तेथे पाच नव्या चौक्‍या उभारल्या जाणार आहेत. तसेच, अधिकारी-अंमलदारांकरिता विश्रांती कक्ष, महिला कर्मचारी-अधिकाऱ्यांकरिता स्वतंत्र कक्ष बांधला जाईल. क्षेपणभूमीकडे येणारे-जाणारे मार्ग पोलिसांनी शोधले आहेत. त्या ठिकाणी उपाययोजना केली जाईल. हा परिसर मोठा असल्याने तेथे सीसी टीव्हीद्वारे करडी नजर ठेवली जाते; पण आता पोलिस "वॉच टॉवर'द्वारेही नजर ठेवणार आहेत. त्याकरिता 13 नवे वॉच टॉवर उभारण्यासह हायमास्टचे 13 दिवे लावले जाणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. 

कचरा वेचकांना बंदी 
पोलिसांनी दिलेल्या सूचनांवर पालिकेने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता क्षेपणभूमीत पोलिसांची 24 तास सुरक्षा असणार आहे. पोलिसांनी क्षेपणभूमी परिसरात कचरा वेचकांना प्रवेश बंदी केल्यामुळे आगीचे प्रकार थांबले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज ढेपाळले; अर्धा संघ झाला बाद

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT