मुंबई

नवी मुंबईत शिवजयंती उत्साहात साजरी

सकाळवृत्तसेवा

बेलापूर -  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील बेलापूर, सीवूडस्‌, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, ऐरोली आणि दिघा भागातील विविध मंडळे, सामाजिक व सांस्कृतिक संस्था आदींनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी ७ पासून दुचाकीवरून रॅली काढण्यात आली. सर्वच ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

सामाजिक संस्थांतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लाऊड स्पीकरवर पोवाडे सुरू होते. सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांनी एकसारखे पोशाख परिधान केले होते. लहान मुलांनी शिवरायांची वेशभूषा केली होती. 

महापालिकेतर्फे कार्यक्रम 
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते, आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या उपस्थितीत ब्रान्टो स्कायलिफ्टच्या सहायाने पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापालिका मुख्यालयातही महापौर सुतार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे प्रतिमापूजन करण्यात आले. माजी उपमहापौर अविनाश लाड, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड आदी यावेळी उपस्थित होते. 

वारलीपाड्यात जयघोष
तुर्भे (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हजारो शिवप्रेमींनी केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ च्या जयघोषाने नवी मुंबई शहर दुमदुमले. शहरात अनेक ठिकाणी शिवजयंती साजरी होत असताना शिवछत्रपतींचा इतिहास माहिती व्हावा व त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा म्हणून ‘महाराष्ट्र एकता ग्रुप’च्या वतीने पावणे येथील वारलीपाड्यात मोहीम राबवून फळवाटप करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान मुलांना खाऊ व राजा शिवछत्रपती यांच्याविषयी माहिती देण्यात आली. 

गरिबांच्या घरी राजे स्वतः जाऊन त्यांची विचारपूस करत असत, अशी माहिती मंडळाचे संघटकप्रमुख बाळकृष्ण खोपडे यांनी दिली. वारलीपाडा गाव बचाव कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा वड, कैलास सालकर, तुलसीदास चौधरी, महाराष्ट्र एकता ग्रुप नवी मुंबईचे सदस्य गोविंद जाधव, बबलू पांडे, राहुल चादणेरी आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT