मुंबई

छोटा राजन विरोधातील CBI ने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष मोक्का न्यायालयाने केला नामंजूर

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 5 : व्यावसायिक वैमनस्यातून केबलचालकाची हत्या केल्याच्या आरोप असलेल्या प्रकरणात गैगस्टर छोटा राजन विरोधात पुरावा नसल्याने सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष मोक्का न्यायालयाने नुकताच नामंजूर केला.

वर्ष 2005 मध्ये केबल चालक संजय गुप्ता यांची त्यांच्या दुकानात घुसून अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पनवेलमधील व्यावसायिक कारणांमुळे ही हत्या राजन टोळीकडून करण्यात आली होती असा आरोप पोलिसांनी केला होता. यामध्ये अटक झालेल्या तीन आरोपींना वर्ष 2011 मध्ये विशेष न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. तर ठाणे न्यायालयात आणखी दोन जणांविरोधात खटला सुरू आहे. 

CBI ने काही दिवसांपूर्वी विशेष मोक्का न्यायालयात राजन आणि अन्य पाच जणांविरोधात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. यामध्ये पुरावे उपलब्ध नाहीत, त्यामुळे सबळ खटला दाखल होऊ शकत नाही, असे कारण सीबीआयने दिले आहे. मात्र हा अहवाल विशेष न्या. ए टी वानखेडे यांनी नाकारला आहे. आरोपींविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरेसा पुरावा आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

साक्षीदार फितूर झाले हे कारण होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांची साक्ष नोंदवायला हवी, असे न्यायालयाने म्हटले आहे. राजन सध्या तिहार कारागृहात असून त्याच्या विरोधात सुमारे पन्नास फौजदारी प्रकरणे दाखल आहेत.

mumbai news special Mocca court rejects closure report filed by CBI against Chhota Rajan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT