Mumbai News Dog Bites A child condition Critical sakal
मुंबई

Mumbai News: मुंबईत भटक्या कुत्र्याची दहशत; हल्ल्यात आठ जण जखमी!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Street Dog: मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड-आंबेवाडी नाक्यावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिसाळलेल्या श्वानाची दहशत पसरली आहे. आतापर्यंत या श्वानाने आठ जणांना चावा घेतला असून या प्रकाराने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

कोलाड-आंबेवाडी नाक्यावरील बाजारपेठेमुळे या परिसरात नेहमी वर्दळ असते. अशातच गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी भटक्या श्वानांचे समूह आढळून येत आहेत. बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्यांवर तसेच शाळा, महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर श्वान धावून आल्याने अनेक जण जखमी झाले आहेत.

सध्या हल्ला करण्याचे प्रकार वाढले असून आठ जण जखमी आहेत. त्यामुळे याबाबतची तक्रार ‘सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ’ या सामाजिक संस्थेकडून करण्यात आली होती. त्यानुसार या श्वानाला जेरबंद करण्यात आले असल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कुत्रा चावल्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी सामान्य लोकांत फार कमी प्रमाणात माहिती आहे. यामुळे जगभरातील श्वानदंशाने होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यू एकट्या भारतात नोंदवले जातात.

- सागर दहींबेकर, अध्यक्ष, सामाजिक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT