BMC School 
मुंबई

Mumbai : मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना यंदा मिळणार नाही रोख रक्कम; पाण्याची बॉटल, दप्तर...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गेल्या वर्षी प्रस्ताव उशीरा मंजूर झाल्याने विद्यार्थ्यांना दप्तर, पाण्याची बॉटल, खाऊचा डबा देण्याऐवजी रोख पैसे देण्यात आले होते. यंदा मात्र यंदा रोख रक्कम न देता दप्तर, वॉटर बॉटल व खाऊचा डबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुलांना २९० ते ४४४ रुपयांपर्यंतचे दप्तर तर १९३ ते २९६ रुपयांपर्यंत खाऊचा डबा आणि पाण्याची बाटली दिली जाणार आहे

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय २००७ मध्ये घेण्यात आल्यानंतर तेव्हापासून मुलांना या वस्तूंचे वाटप केले जात आहे. परंतु मागील वर्षी निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने या शालेय वस्तूंच्या खरेदीचा प्रस्ताव १७ जून २०२२ पासून मंजूर करण्यात आला. त्यामुळे मुलांना शालेय साहित्य मिळण्यास विलंब झाला होता.

मुलांना छत्रीसह दप्तर, पाण्याची बॉटल व खाऊचा डबा आदी वस्तू न देता त्यासाठीचे पैसे मुख्याध्यापकांमार्फत मुलांना वाटप करून या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र २०२२ - २३ व २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्याचे कंत्राट दोन वर्षांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना रोख रक्कम न देता दप्तर वाॅटर बाॅटल व खाऊचा डबा देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.

या वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मर्चडायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी निविदेत पात्र ठरली असून या वस्तूंच्या खरेदीसाठी २० कोटी ०३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

मुलांना दप्तर, बॉटल आणि खाऊचा डब्बा या वस्तूंसाठी होणारा खर्च

- पूर्व प्राथमिक ते दुसरी इयत्ता( एकूण मुले १, १२,९२८) : खर्च प्रत्येकी ४८३. ०२ रुपये

- इयत्ता तिसरी ते सातवी ( एकूण मुले १, ७३,७५५): खर्च प्रत्येकी ६१५ रुपये

- इयत्ता आठवी ते दहावी( एकूण मुले ७४,२५३) : खर्च प्रत्येकी ७४० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

IND vs AFG, 2nd ODI : शुभमन गिल - ईशान किशनची वादळी शतके! भारतीय संघ ४०० धावा पार अन् विश्वविक्रमाची बरोबरी

Nashik Road News : रेल्वेस्थानकावर आरपीएफचे ‘ऑपरेशन मातृशक्ती’; पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रसूत महिला, नवजात बालकावर वेळेत उपचार

Baba Vanga Prediction : निम्मा जून उलटूनही पाऊस नाही! 2026 बद्दल बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरतीये का? नेमकं काय म्हटले होते?

Latest Marathi News Live Update : तेलंगणा क्रिकेट असोसिएशनने चित्रपट अभिनेते विजय देवरकोंडा आणि व्यंकटेश, तसेच क्रिकेटपटू तिलक वर्मा, अंबाती रायडू आणि मोहम्मद सिराज यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या

SCROLL FOR NEXT