political  sakal
मुंबई

Mumbai News : तटकरे-पटेल यांच्यावर कारवाई करा; शरद पवार गटाचे ओम बिर्लांना पत्र

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनी लोकसभा अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शरद पवार गटाच्या वतीने राज्यसभा सभापती जगदीप धनकड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि लोकसभा खासदार सुनील तटकरे यांचे निलंबन करावे अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांना स्वतंत्रपणे पत्र पाठवून संबंधित खासदारांच्या अपात्रतेसंबंधीच्या निर्णयास केवळ तांत्रिक प्रक्रियेच्या कारणास्तव विलंब लावणे दहाव्या परिशिष्टात अपेक्षित नाही, तसेच संबंधित निर्णय अधिकाऱ्यांनीही अशा प्रकारे त्यास अनुमती देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी तटकरे आणि पटेल या दोन खासदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देऊन ‘एनडीए’ आघाडीत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही भूमिका पक्षाच्या धोरणाविरोधात असल्याचे या पत्रांमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''होर्मुझ' आता आम्ही चालवणार'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान, अनेक देशांकडून टोल वसुली करण्याचा मनोदय

Pick Up Scooty Accident : भरधाव पिकअपची स्कुटीला धडक; खिर्डी येथील तरुणाचा मृत्यू, एक जखमी

Pune Crime : बोपदेव घाट अत्याचार प्रकरण; आरोपी घाटात आल्यापासून ते कोणत्या मार्गाने पळून गेल्याची साक्ष नोंदवली

Khamgaon News : खामगावात पॅथॉलॉजीस्‍ट डॉक्‍टरचा संशयास्‍पद मृत्‍यू; शरीरावर आढळल्या जखमा

Manchar Accident : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला; एसटीच्या धडकेत अकरावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT