BJP 
मुंबई

टेरेस हॉटेल विरोधाची भाजपची तलवार म्यान

वृत्तसंस्था

मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या टेरेसवरील उपहारगृह या संकल्पनेला पालिकेने मंजूरी दिल्याने पालिकेतील भाजप तोंडघशी पडला आहे. या प्रस्तावाला कडवा विरोध करणाऱ्या भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना विरोधाची तलवार म्यान करावी लागली आहे. शिवसेनेला वारंवार खिंडीत गाठणाऱ्या भाजपावर मात करण्यात शिवसेनेला यश आले आहे.

मनसेतून फूटून सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्यापासून पालिकेतील सत्तेचे दावे करणारा भाजप हतबल झाला आहे. टेरेस हॉटेलच्या धोरणाला मंजूरी मिळवून भाजपला सेनेने दुसरा धक्का दिला आहे. आदित्य यांनी नाईट लाईफ आणि टेरेसवरील उपहारगृहांना मान्यता देण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार सन 2014 मध्ये पालिकेने रुफ टॉपची पॉलिसी आणली होती. मात्र भाजप, मनसेने विरोध केल्यामुळे हा प्रस्तावाला सुधार समिती आणि पालिका सभागृहाच्या मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता. मुंबईत टेरेसवरील अनेक हॉटेल्स बंद पडली असून हजारो तरूणांचे रोजगार बुडाले असल्याचा दावा सेनेने केला होता. याबाबत प्रशासनाने सुधारित धोरण तयार केले होते. या धोरणाला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गेल्या बुधवारी स्वतःच्या अधिकारात प्रशासकीय मंजूरी दिली आणि त्याची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेशही दिले आहेत. पालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी देवून अप्रत्यक्षपणे शिवसेनेला मदत केली आहे.
त्यामुळे भाजपचे गटनेते कोटक हे नाराज झाल्याचे समजते. अशा पध्दतीने प्रस्ताव मंजूर करू नये, तो प्रस्ताव रितसर पालिकेच्या सभागृहात मंजूरीसाठी आणावा अशी खलबते भाजपच्या गोटात सुरू असल्याचे समजते.

गटनेत्यांच्या सुचनांचा समावेश करून हे नवीन धोरण तयार करण्यात आले असून आयुक्तांच्या अधिकारात लागू झाले आहे. पालिकेत कोणतेही धोरण सभागृहाच्या मंजुरीशिवाय अंमलात आणता येत नसताना सेनेने राजकीय दबावाचा वापर केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही होता.

टेरेसवरील उपहारगृहांना भाजपने पालिकेत विरोध केल्यामुळे हे धोरण मंजुर होऊ शकले नव्हते. दोन वर्षांपूर्वी सुधार समितीत भाजपने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात संतापाचे वातावरण होते. त्यानंतर शिवसेनेने हे धोरण थेट सभागृहाच्या मंजुरीसाठी मांडून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशासनाला हाती धरून सेनेने हे धोरण आयुक्तांकडून मंजुर करून घेतले आहे. त्यावरून आता भाजप सेनेतील कलह होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission News : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! DA अन् DR मध्ये लवकरच वाढीचे संकेत

Hindu Youth Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरूणाला मारलं! २० दिवसांत कट्टरपंथीयांकडून सातवी हत्या

Pune Election: पुण्यात भाजपने नाराजांची काढली 'अशी' समजूत; तिकीट न मिळालेल्या इच्छूकांवर नवी जबाबदारी

MPSC Success : येरमाळ्याच्या वैभवची यशाची 'हॅट्ट्रिक'! तलाठी, एसटीआयनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून 'पुरवठा अधिकारी' पदी झेप!

Caste Certificate Protest : मुलाला जातीचा दाखला नाकारला; अन् आईने टॉवरवर चढून १४ तास केले आंदोलन; पोलिसांच्या शिष्टाईने सुखरूप सुटका!

SCROLL FOR NEXT