मुंबई

Mumbai News: घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला पोलीसांनी ४८ तासांत केली अटक

सकाळ वृत्तसेवा

Nalasopara: विरारच्या एका बंगल्यात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला ४८ तासांत अटक करण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

या आरोपीकडून तब्बल २७ लाख ६५ हजार रुपयांचे ३९५ ग्रॅम सोने हस्तगत केले. अटक आरोपीवर पालघर, ठाणे, मुंबई या परिसरात पाच गुन्हे दाखल असून तो सराईत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.

सोनू शेख (वय ४३) असे अटक आरोपीचे नाव असून हा ठाणे परिसरातील राहणारा आहे. विरारच्या डोंगरपाडा येथील सौरभ चौधरी (वय ३५) यांच्या घरी लाखोंची चोरी झाल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील ४७० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

विरार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. चार पथके तयार करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून त्याआधारे संशयित आरोपी निष्पन्न झाला. त्याचा शोध घेण्यासाठी अंदाजे १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीचा पाठलाग केला.

४०० पेक्षा अधिक सीसीटीव्हींचा तपास

आरोपीने विरार ते बोरिवली लोकल ट्रेनने, बोरिवली येथून मानपाडापर्यंत बसने व तेथून पुढे रिक्षाने प्रवास केल्याचे दिसून आले. आरोपी शेवटी रिक्षातून उतरलेल्या ठिकाणी असलेल्या ४०० च्या वर सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. आरोपी हा मानपाडा येथील वसंतविहार परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT