nana ptole 
मुंबई

Mumbai : नंदू जोशी प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी अधिवेशनात मुद्दा मांडणार; पटोलेंचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली - ऑपरेशन लोटस हे पुण्याचे काम आहे असं भाजप वाले समजतात. दुसऱ्याचं घर बरबाद करण्यात हे त्याचा आनंद व्यक्त करतात. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाच्या बद्दलची भूमिका मांडली. त्या भूमिकेला थोडसं भाजपाने समजलं तर त्यांना कळेल त्यांनी मोठं पाप केलंय. पण भाजप याला पुण्य समजतात तर तो त्यांचा प्रश्न आहे.

त्या पापाला पुण्याकडे घेऊन जाण्याचा हे प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जनता एवढी दूधखुळी नाही. अन्यायाच्या विरोधात आणि लोकशाही व्यवस्थेला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्याचं काम जे भाजप करतंय त्याला महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असे मत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कल्याण येथे व्यक्त केले.

कल्याण येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पत्रकार परिषदेत पटोले यांनी भाजप व शिंदे गटावर टीका करत लक्ष केले. यावेळी संतोष केणे, सचिन पोटे, नविन सिंग यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात 19 ठिकाणी जाती आणि धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे महाराष्ट्राला त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल नाना पाटोले यांनी उपस्थित केला. ज्या ठिकाणी दंगली झाल्यात त्या ठिकाणी गेलो असता या दंगली मुद्दामून घडवल्या जातात असे दिसले.

भाजप जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरले म्हणून या पद्धतीच्या कुरघोड्या करून पुन्हा एकदा निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. हे यशस्वी होणार नाहीत असं नाना पाटोले म्हणाले.

कल्याण डोंबिवलीत दोन मंत्री महत्त्वाचे आहेत. एक मुख्यमंत्री आहेत दुसरे मंत्री आहेत. या दोघांचे असे आहे की आम्ही लोकांना विकत घेऊन टाकतो कोणी किती ही मोठा मेळावा घेऊ दे.

आम्ही निवडणुकीच्या वेळेला जनतेला विकत घेऊ असे बोलल्याचे ऐकायला मिळतंय. पैसा जनतेचाच हे जेव्हा आमदार, मंत्री नव्हते तेव्हा कोण होते ? असा टोला नाना यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लगावला.

भाजपाचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिला गेल्या 8 दिवसांपासून मानपाडा पोलीस ठाण्याबाहेर उपोषणाला बसली आहे. याबाबत बोलताना नाना पटोले यांनी तिकडचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक हा काय शासनापेक्षा मोठा नाही होऊ शकत. मुख्यमंत्री महिलेला न्याय देऊ शकत नाही का? सीनियर पोलीस एवढा काय मोठा झाला? किती खोक्यांना आलाय? कोणाला दिले? असे प्रश्न उपस्थित केले.

सीनियर पीआय कारवाई करत नसेल तर या सरकारचा धाक प्रशासनावर राहिला नाही हे सिद्ध होते. गुन्हेगाराला का अटक केली जात नाही ? कोणाचा दबाव आहे ? त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? हा प्रश्न आहे. अधिवेशनात मुद्दा घेऊन महिलेला न्याय मिळवून देण्याची भूमिका काँग्रेस ची राहील असे पटोले यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT