Mumbai News sakal
मुंबई

Mumbai News: कारमध्ये गुदमरून चिमुकल्यांचा मृत्यू ; सात वर्षांचा भाऊ, पाच वर्षांच्या बहिणीचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: अँटॉप हिल परिसरातील सेक्टर पाच येथे कारमध्ये गुदमरून बहीण-भावाचा मृत्यू झाला. साजिद मोहम्मद शेख (वय ७) आणि रीना मोहम्मद शेख (वय ५) अशी त्या दोघांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अँटॉप हिल परिसरातील सेक्टर पाच येथे एका झोपडीत साजिद आणि रीना आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. बुधवारी दुपारी दीड वाजल्यापासून मुले दिसली नाहीत म्हणून आईने शोधाशोध केली.

परंतु ती मुले जवळपास कुठेही आढळली नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी अँटॉप हिल पोलिस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांकडून व कुटुंबीयांकडून या दोघांचा शोध सुरू करण्यात आला.

पोलिसांना शोध घेताना एका कारमध्ये दोघांचे मृतदेह सापडले. घरापासून ५० मीटर अंतरावर ही कार होती. खेळताखेळता गाडीत अडकून गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अँटॉप हिल पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत बेवारस वाहनांबाबत वेळोवेळी मोहीम राबविण्यात येते. आता बेवारस वाहनांची मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल.

- अनिल कुंभारे, सहपोलिस आयुक्त (वाहतूक)

कोणतीही गाडी उभी करताना काच एक इंच खाली असावी, ज्यामुळे हवा खेळती राहते. चुकून मुले आत गेली तर त्यांच्या जीवावर बेतणार नाही, तसेच अनेकदा उन्हाळ्यात गाड्यांना आग लागण्याच्या घटना घडतात. काच खाली असेल तर आग लागणार नाही.

- शोएब शेख, कार तंत्रज्ञ

माणसे गाडी उभी करून निघून जातात. ती गाडी कित्येक दिवस तिथेच राहते. त्यामध्ये समाजविघातक घटना किंवा दुर्घटना घडण्याची शक्यता असते. यापूर्वीही मुलांचा कारमध्ये अडकून मृत्यू झाला होता. उन्हाळ्यात मुले गाडीत खेळण्याचे प्रकार जास्त घडतात. उन्हामुळे गाडीचे तापमान वाढते. दरवाजे बंद झाले की ऑक्सिजन नसतो. काचा बंद असल्याने आवाजही येत नाही. लहान मुलांना दरवाजा उघडताही येत नाही. त्यामुळे असे अपघात घडतात. त्यामुळे पार्किंग धोरण असायला हवे.

- संदीप गायकवाड, वाहतूक अभ्यासक, परिसर संस्था

बेवारस गाड्यांना लगाम लावण्यासाठी पार्किंगसाठी शुल्क आकारण्याची गरज आहे. एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीनंतर बेवारस गाडी तिथेच राहिली तर ती हटविण्यात यावी. त्या कारच्या टोईंगचा खर्च दिला नाही, तर गाडीच्या विक्रीतून घेतला जावा. त्यासाठी कठोर पार्किंग धोरण आवश्यक आहे.

- अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT