मुंबई

तरुणाला जिवंत करण्यासाठी प्रार्थना

सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर - मृत तरुणाला जिवंत करण्यासाठी तब्बल १० दिवस प्रार्थना सुरू होती. त्यामुळे मृतदेहाची विटंबना झाली. मुंबईतील नागपाडा आणि अंबरनाथमध्ये उघडकीस आल्यानंतर संबंधितांची धावपळ उडाली. 

मशक ऑक्‍टोविवो (वय १७) या नागपाडा - चिंचपोकळी येथील तरुणाचा २७ ऑक्‍टोबरला मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात कर्करोगामुळे मृत्यू झाला. त्याचा मृतदेह नागपाडा येथील चर्चच्या इमारतीत तळमजल्यावर ठेवून तब्बल नऊ दिवस त्याला जिवंत करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्याचा मृतदेह शीतपेटीत ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे मृत तरुणाचे वडीलही फादर आहेत. मात्र, मृत तरुण जिवंत न झाल्याने रविवारी (ता. ५) मृतदेह अंबरनाथ येथील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाशेजारील जीजस फॉर ऑल नेशन्स चर्चमध्ये नेण्यात आला. तिथे आठ तास रात्री ११ पर्यंत प्रार्थना झाली. 

या प्रकाराची कुणकुण लागताच नागरिक आणि पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची आणखी गर्दी होण्याच्या शक्‍यतेने तेथील महिलांनी पत्रकार आणि नागरिकांना मज्जाव करीत चर्चला आतून टाळे लावले. त्यानंतर वीजपुरवठा बंद करून रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन ते मुंबईच्या दिशेने गेले. पोलिसही घटनास्थळी पोहचले. त्या वेळी चर्चमध्ये आणखी एक शवपेटी मिळाली. 

प्रार्थनेने कुणीही मृत जिवंत होऊ शकत नाही, हे वैज्ञानिक सत्य आहे. मशकचा मृतदेह त्याच्या नातलगांनी नागपाडा येथे नेला आहे. त्याच्यावर अंत्यविधीची प्रक्रिया तातडीने करावी, अशी सूचना दिली आहे. नागपाडा पोलिसांनाही याबाबत कळवले आहे. ते संबंधितांचा जबाब नोंदवणार आहेत.
- सुनील पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, अंबरनाथ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT