Mumbai Signal sakal media
मुंबई

BMC : मुंबईतील सर्व रस्त्यांवर होणार 'स्मार्ट सिग्नल' यंत्रणा

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईतील सर्व रस्त्यांवरील सिग्नल (Signals on Mumbai Roads) येत्या काळात स्मार्ट होणार आहे. वाहानांचा अंदाज घेऊन सिग्नलचा कालावधी ठरणार आहे. आतापर्यंत 258 सिग्नल स्मार्ट (Smart signal System) झालेले असून दुसऱ्या टप्प्यात 70 महत्वाच्या जंक्शनवरील सिग्नल स्मार्ट होणार आहेत. मध्य मुंबईतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईला जोडणारा पी.डी’मेलो मार्ग आणि कफ परेड परीसरातील 70 जंक्शन वरील सिग्नल स्मार्ट होणार आहेत. त्यासाठी महानगरपालिका (BMC) या जंक्शनचा भुगोल आणि वाहतुकीचा अभ्यास करुन कृती आराखडा (Action plan) तयार करणार आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे.

पुढील दोन ते अडीज वर्षात हे 70 जंक्शनवरील सिग्नल स्मार्ट होण्यास सुरवात होईल. असे पालिकेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मुंबईतील जंक्शनवर तब्बल 652 सिग्नल्स असून त्यातील आतापर्यंत 258 सिग्नल स्मार्ट पध्दतीने अद्यावत करण्यात आले. तर, आता 70 सिग्नल अद्यावत करण्यात येणार आहेत. उर्वरीत 324 सिग्नल टप्प्याटप्याने स्मार्ट करण्यात येणार आहेत.

Smart signal

काय आहे स्मार्ट सिग्नल ?

पारंपारीक सिग्नल पध्दतीत त्याचा कालावधी निश्‍चित केलेला असतो. म्हणजे लाल दिवा किती वेळ राहील, हिरवा दिवा किती वेळ राहील हे निश्‍चित असते. स्मार्ट सिग्नलींग पध्दतीने रस्त्यावरील वाहानांच्या संख्येनुसार सिग्नल स्वयंचलित पध्दतीने हा कालावधी ठरवतो. त्यात सिग्नलचा जास्तीत जास्त कालावधी निश्‍चित केलेला असतो. त्यानुसार सिग्नल स्वयंचलित पध्दतीने वेळ निश्‍चित करते.

मुंबईत फायदा काय ?

- मुंबईत वाहतुक प्रामुख्याने ...का दिवशेने होत असते.सकाळच्या वेळेस वाहतुक उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि संध्याकाळच्या वेळेला वाहतूक दक्षिणेकडून उत्तरेकडे होते.

-सिग्नलचा कालावधी ठरवलेला असल्याने ज्या बाजूला वाहनांची कोंडी आहे त्या बाजूची नाहक वेळ वाया जातो.

-जर स्मार्ट सिग्नल असतील तर वाहानांच्या संख्येनुसार सिग्नलचा कालावधी ठरु शकेल.

-त्यामुळे ज्या बाजुला वाहानांची सख्या जास्त आहे त्या बाजूला सिग्नल जास्त काळ सुरु राहून कोंडी सुटण्यास मदत होईल.

सल्लागार कशासाठी ?

महानगर पालिकेने सल्लागार नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. हा सल्लगार ठरलेल्या जंक्शनवरील वाहतुकीचा अभ्यास करेल. यात वर्दळच्या वेळी विना वर्दळीच्या वेळी कोणत्या बाजूला किती वाहाने असतात. याचा अभ्यास असेल तसेच पादचाऱ्यांचाही अभ्यास केला जाईल. त्याचबरोबर जंक्शनवरील वेग मर्यादा,अवजड वाहानांची संख्या बसेसची संख्या फेरीवाले यांचाही अभ्यास करुन अहवाल तयार करण्यात येईल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येईल. साधारण अडीज वर्षापर्यंत हा अभ्यास चालेल.

(छायाचित्रे - प्रशांत चव्हाण )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT