Kishori Pednekar sakal media
मुंबई

केईएम रुग्णालयातील 'त्या' प्रकरणात महापौर पेडणेकर यांचे कारवाईचे आदेश

भाग्यश्री भुवड

मुंबई : केईएम रुग्णालयात (KEM hospital ragging case) एका विद्यार्थ्यावर झालेल्या रॅगिंग प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भेट घेतली. हा प्रकार समोर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तात्काळ रुग्णालयात दाखल होऊन कायद्यानुसार कारवाई (legal action order) करण्याचे आदेश या प्रकरणी महापौरांकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, यावेळेस पेडणेकर यांनी पिडीत मुलगा आणि त्याचे वडील यांचीही भेट घेतली. महापौरांनी सांगितले की, " मी आज केईएम प्रशासन, पीडित मुलगा आणि ज्यांनी हा प्रकार केला त्यांना समोरासमोर उभं केलं. शिवाय, आई म्हणुन सल्ला दिला आहे. तसेच, पीडीत मुलावर लक्ष ठेवायला सांगितले असून  कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीडित मुलाच्या वडीलांसोबतही बोलणे झाल्याचे महापौरांनी सांगितले.

मुंबईतल्या केईएम रुग्णालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने हा आरोप केला आहे. 2019 आणि 2020 या वर्षात आपण लेखी तक्रार दिली होती. पण, त्या तक्रारीची दखल कोणीही घेतली नाही असा आरोपही या विद्यार्थ्यांने केला असून केईएम रुग्णालयात पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

दरम्यान, या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दोषी विद्यार्थी, वॉर्डन तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिष्ठाता, वॉर्डन आणि विद्यार्थ्यांवर कारवाई न झाल्यास  आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांनी दिला आहे. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पीडित मुलगा खूप घाबरला आहे. त्यामुळे, त्याच्या वडीलांना लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्याला वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले असून इतर विद्यार्थ्यांनाही वेगळे ठेवले गेले आहे. कायद्यानुसार कारवाई आणि चौकशी करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT