मुंबई

BMC च्या रडारवर यंदा 28 महाप्रकल्प, आगामी वर्षात मुंबईचा विकास फास्टट्रॅकवर ?

समीर सुर्वे

मुंबई, ता.5 : मुंबई महानगर पालिकेच्या 23 महत्वाच्या प्रकल्पांचा खर्च वर्षभरात सुमारे सात हजार कोटीहून अधिक रक्कमेने वाढला आहे. या महाप्रकल्पांचा खर्च चालू वर्षात 79 कोटी 829 कोटी होता तर आगामी अर्थीक वर्षात हा खर्च 86 हजार 787 वर पोहचला आहे.

महानगर पालिकेच्या रुग्णालयांचा विस्तार, सायकल ट्रॅक, जलवाहीन्या बदलणे, जलबोगदे बांधणे, पंपिंग स्टेशन तसेच नरीमन पॉईंट ते वरळी पर्यंतचा सागरी किनारी मार्ग, मुलूंड गोरेगाव जोड रस्ता, कचऱ्या पासून विज निर्मीतीचे प्रकल्प अशा महत्वांकाक्षी प्रकल्पांसाठी या अर्थीक वर्षात 79 हजार 829 कोटी रुपयांचा खर्च अंदाजित होता.

तब्बल 23 महत्वाच्या प्रकल्पांसाठी 10 हजार 8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आहे. तर, आगामी आर्थिक वर्षासाठी यात दोन कोटीहून अधिक वाढ करत 12 हजार 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू वर्षाच्या तुलनेने आगामी वर्षात या महत्वाच्या प्रकल्पांचा खर्च 6 हजार 958 कोटींनी वाढला आहे.

कचऱ्यापासून विज निर्मीतीचा खर्च या आर्थिक वर्षात 2 हजार 395 कोटी रुपयांचा खर्च अंदाजित होता. मात्र, आता पहिल्या टप्प्यातील 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्पासाठी निवीदा मागवल्यानंतर खर्चाचा अंदाज आला. हा खर्च तब्बल तीप्पट 6 हजार 274 कोटी पर्यंत अंदाजित करण्यात आला आहे. देवनार येथे 1800 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यात,1200 मेट्रीक टन प्रकल्पासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत.

28 प्रकल्प रडारवर
महानगर पालिकेने गेल्या वर्षी 23 प्रकल्प रडारवर घेतले होते. तर, यंदा ही संख्या 28 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यात शिवकोळीवाडा वसतीगृह 212 कोटी 27 लाख,नायर रुग्णालयाची नवी इमारत 187 कोटी, महात्मा फुले मंडईचा पुनर्विकास टप्पा दोन 304 कोटी 19 लाख,परळ शिरोडकर मंडईचा पुनर्विकास 93 कोटी 38 लाख असा 796 कोटी रुपयांचा खर्च वाढला आहे. 

mumbai news updates 28 megaproject on the radar of brihanmumbai municipal corporation

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

Madhavi Latha: "गुन्हे मेडल्ससारखे," बुरखा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माधवी लता आणखी काय काय म्हणाल्या

Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

IPL 2024: क्वालिफायर अन् फायनल स्टेडियममध्ये जाऊन पाहायचेत? कसे आणि कधी करणार तिकीट बूक, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT