मुंबई

विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासासाठी वर्षा गायकवाड मुख्यमंत्र्यांच्या दारी

सुमित सावंत

मुंबई: येत्या १५ तारखेपासून महाविद्यालय सुरु होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. 

तसंच आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाबाबतही येत्या दोन दिवसात अधिकृत निर्णय घेणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. 

पुढे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. आंदोलनकर्त्यांना आर्थिक तरतूद देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सोमवारपासून राज्यात उघडणार महाविद्यालयाचे दरवाजे 

गेल्या आठवड्यात १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. कुलगुरुंशी चर्चा झाली आणि त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

बसण्याच्या व्यवस्थेच्या ५० टक्के उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी आहे. विद्यालये सुरू होताना वसतीगृहे सुरू करताना ती टप्प्याटप्प्याने सुरू होतील. परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन याचा निर्णय विद्यापीठांनी घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. 

तसंच  शहरातील विद्यार्थी ग्रामीण भागात गेले आहेत त्यांना शिक्षण ऑफलाइन घ्यायचे की ऑनलाईन याचा अधिकार विद्यार्थ्यांना असेल. स्ट्रक्चरल ऑडीट, फायर ऑडिट करूनच वसतीगृहे सुरू होणार आहेत. 

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai news Varsha Gaikwad will discuss Uddhav Thackeray for students local train

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT