Water Tap Sakal
मुंबई

Mumbai News : एकीकडे कडक उन्हामुळे जिवाची काहिली; त्यात बसणार पाणीकपातीची झळ

पाण्याविना मुंबई कोरडी; मुंबईकरांना बसणार पाणीकपातीचा फटका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई, ता. २९ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे; तरीही मुंबईकरांना तब्बल महिनाभर १५ टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाण्यात कूपनलिकेच्या खोदकामामुळे गळती निर्माण झाल्याने मुंबईत पाण्याची समस्या भेडसावणार आहे.

दुरुस्तीचे काम शुक्रवार (ता. ३१) पासून हाती घेण्यात येणार असून ते अभियांत्रिकीच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरणार आहे. सुमारे दीडशे फूट खोल उतरून जलवाहिनीची दुरुस्ती होणार आहे. एकीकडे कडक उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना पाणीकपातीच्या झळांनी मुंबईकर बेजार होणार आहे.

जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेचा अभियांत्रिकी विभाग करणार आहे. दुरुस्तीकाम अत्यंत किचकट असून त्यासाठी सुमारे दीडशे फूट जमिनीखाली उतरावे लागणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री आणि कामगार व तंत्रज्ञ लागणार आहेत. जशी यंत्रे लागतील तशी कामगारांची गरज भासणार आहे.

जलबोगदा बंद करून त्यातील पाणी काढून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर दुरुस्तीकाम सुरू केले जाईल. काम महिनाभर चालणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अभियंते (प्रकल्प) वसंत गायकवाड यांनी दिली. दुरुस्तीकामामुळे संपूर्ण मुंबईला पाणीकपात सहन करावी लागणार आहे. मुंबईच्या अनेक भागांत आधीच कमी दाबाने आणि

अपुरा पुरवठा होत असतो. त्यात आता पाणीकपात लागू होणार असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Raju Shetty: राज्य सरकार दलाली करतंय का: राजू शेट्टी

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

मला डावललं गेलं, मी फोन केले तरीही... अभिनेत्याने सांगितलं 'पारू' मालिका सोडण्याचं खरं कारण, म्हणाला- त्यांनी मला...

SCROLL FOR NEXT