Mumbai News sakal
मुंबई

Mumbai News: मेट्रो स्थानक परिसरातील गटारांची दुरूस्ती कधी होणार?

या मुळे मुख्य जंक्शनच्या रस्त्यावर वाहनांची वाहतूक नेहमीच प्रभावित होत असते |

सकाळ वृत्तसेवा

Malad News: आनंद नगर मेट्रो स्थानक लगत च्या गटारांची दुरुस्ती कधी होणार. एमएमआरडीए कडून मेट्रो 2 ए प्रकल्पासाठी दहिसर येथील आनंद नगर स्थानकाजवळ प्रवासी च्या सुविधांसाठी या स्थानकाजवळील क्षेत्रात आलेले मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या आठ फूट रुंदीचा जुन्या पदपथांची रूंदी वाढवून अठरा फूट रुंदीचा करण्यात आले आहे.

ज्यामुळे येथील मुख्य रस्त्याची रुंदी कमी झाली या मुळे मुख्य जंक्शन च्या रस्त्यावर वाहनांची वाहतूक नेहमीच प्रभावित होत असते .

स्थानकांचे आसपासचा मुख्य रस्ते च्या पदपथाच्या कडेला थोड्या थोड्या अंतरावर सहा फूट लांबी आणि अडीच फूट रुंदीच्या कालवा बनवून त्यावर लोखंडी चौकटीत लादी लावून त्याला गटाराच्या चेंबरला जोडण्यात आले आहे.

वर्ष भरा पासून देखरेखीच्या अभावी या अनेक चेंबर वरच्या लादया उखडून पडल्या आहेत. तर काही ठिकाणी लोखंडी फ्रेम तुटलेली आहे. दरवर्षी पावसाळ्यात आनंद नगर मध्ये सखोल भागातील वसाहतीत व मेट्रो स्थानकापासून उड्डाण पूल पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर वर कंबरपर्यंत पाणी साचत.

पादचाऱ्यां साठी दुसरा कोणता ही पर्याय नसल्याने लोकांना या पदपथा वरून चालने भाग पडते मुख्य रस्त्यापासून एक फूट उंचीचा हा नवीन पद पथ पूर्णपणे पाण्याखाली जातो त्या मुळे , तुंबलेले पाण्यात पदपथा वरून ये- जा करताना तुटलेल्या चेंबरात पडून अपघात होऊ शकते.

तेव्हा त्याची जबाबदारी कोण घेणार ? प्रशासन नुकसानीची भरपाई देणार काय ? प्रशासनानं फक्त अपघात होण्याची वाट पाहत बसते का ? एखादी तक्रार केल्या शिवाय प्रशासनाला जाग का येत नाही ? माहिती देताना स्थानिक रहिवासी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंड्या यांनी मागणी केली आहे की एमएमआरडीए प्राधिकरण किंवा पालिका ने लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पावसाळा आधी चेंबर वर लोखंडी चौकटी व लादी - दुरुस्तीचे कामे तात्काळ करावे.

आनंद नगर वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष अमिन कर्णा यांनी सांगितले की मेट्रो स्थानकांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावले असून प्राधिकरण अधिकार्यांना हा पद पथ वरील तुटलेल्या चेंबर्स का दिसत नाही ? 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT