Rajawadi Hospital Mumbai Sakal
मुंबई

Mumbai News : पोटात ११ किलोचा मांसाचा गोळा वर्षभर घेऊन फिरत होती महिला; डॉक्टरांनी केली सुटका

महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी ही दुर्मिळ, अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतली एक महिला गेल्या वर्षभरापासून पोटदुखीने त्रस्त होती. निदानानंतर लक्षात आलं की, या महिलेच्या पोटात तब्बल ११ किलो वजनाचा मांसाचा गोळा होता. हा दुर्मिळ प्रकार असून ही शस्त्रक्रिया अवघड आणि गुंतागुंतीची होती. मात्र महानगरपालिकेच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेललं आहे.

मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ५२ वर्षे वय असणारी एक महिला, रजोनिवृत्तीनंतरची पोटदुखीची तक्रार घेऊन घाटकोपर इथल्या महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात आली. तेथे स्त्री-रोगतज्ञ डॉ. स्वाधीना मोहंती यांनी रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली असता रुग्णाच्या पोटाचे आकारमान प्रमाणाबाहेर वाढल्याचं आढळलं.

त्यामुळे लागलीच सोनोग्राफी आणि एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यात गर्भाशयात मोठं फायब्रॉईड असल्याचं आढळून आलं. ज्यामुळे रक्तवाहिन्या, आतडी आणि मूत्राशयाची जागा थोडी बदलली होती. त्यामुळे या महिलेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. तसंच रक्तक्षय व हायपोथायरॉईडचा आजार देखील झाला होता. त्यामुळे या महिलेला नीट झोपताही येत नव्हतं.

रुग्णालय प्रशासनाने शस्त्रक्रिया करून ११ किलोचा फायब्रॉईड काढून टाकला. ही शस्त्रक्रिया करत असताना मोठ्या रक्तवाहिन्या सुरक्षित करण्यासाठी तसेच मूत्रवाहिनी आणि मूत्राशय हे दोन्ही सुरक्षित राखण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आणि कौशल्य पणाला लावून शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव अपेक्षेपेक्षा कमी झाला आणि रुग्णाच्या जीविताला कोणताही धोका पोहोचला नाही.

आता ही महिला पूर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आता पोटात खूप हलके आणि एकूणच छान वाटते आहे. पोटाच्या गाठीतील वजनामुळे, त्यातून येणाऱ्या अस्वस्थतेमुळे मागील एक वर्षभर पुरेशी झोप घेता आली नव्हती. आता पूर्णपणे बरे झाल्यानंतर झोप पुरेशी लाभत असून त्यामुळे आयुष्य पुन्हा आनंदी झाले असल्याचे या महिलेने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Ticket Booking: रेल्वेच्या ऑनलाइन बूकिंगचा बोजवारा, ऐन दिवाळीत सिस्टिम बंद; प्रवाशांचे हाल

Crime News : धक्कादायक घटना ! पोलिसांची गाडी पाहून तरुणांनी तलावात मारल्या उड्या; तिघांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

कधी मिशीला पीळ, तर कधी हात हातात; ‘सैराट’मधील आर्चीच्या बाबांचा पत्नीसोबत रोमँटिक अंदाज, दिवाळीचे खास फोटो

IND vs UAE: आर्यवीर सेहवागचे वडिलांच्या पावलावर पाऊल! U19 Asia Cup मध्ये ठोकलं खणखणीत शतक

Latest Marathi News Live Update: उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऋषिकेशमधील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी

SCROLL FOR NEXT