mumbai news  sakal
मुंबई

Mumbai News : रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसुती,पोलिस,नागरिकांनी विनवणी करुनही...

मनुष्यबळ अभावी रुग्णालयाने दाखल करण्यास दिला नकार

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली -कल्याण येथील महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात कर्मचारी नसल्याने एका गरोदर अडलेल्या महिलेला प्रशासनाने दाखल करुन घेतले नाही. पोलिस व नागरिकांनी विनवणी करुनही रुग्णालय कर्मचारी महिलेकडे लक्ष देत नव्हते.

याच दरम्यान हातगाडीवर आणलेल्या या महिलेने रुग्णालयाच्या दारातच एका मुलीला जन्म दिल्याची घटना शनिवारी घडली. एका गरोदर महिलेला पाहण्यासाठी देखील कर्मचारी पुढे येत नसल्याने पालिका रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉकवर मोलमजुरी करुन तेथेच गुजराण करणाऱ्या एका फिरस्ता महिलेल्या शनिवारी प्रसूती वेदना सुरु झाल्या होत्या. याविषयी कल्याण महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात काही नागरिकांनी फोन करुन याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हमालाच्या मदतीने सदर महिलेला हातगाडीवरून रुक्मिणीबाई रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याचे कारण देत तुम्ही सदर महिलेला दुसरीकडे घेऊन जा असे सांगितले. वसंत व्हॅली येथील रुग्णालयात महिलेला नेऊन प्रसूती करा असे कर्मचारी वर्ग सांगत असतानाच महिलेच्या प्रसुती कळा वाढत होत्या.

महिलेची स्थिती नाजूक होऊ लागल्याने पोलिसांनी हात जोडून पालिका प्रशासनास महिलेला रुग्णालयात दाखल करुन सुखरुप प्रसूती करण्याची विनंती केली. मात्र कर्मचारी आमच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, अशी उत्तरे देऊन दाराशी आलेल्या महिलेला दाखल करुन घेण्यास नकार देत होते. तिच्याकडे लक्ष देत नव्हते.

अखेर या दरम्यान महिलेने हातगाडीवरच एका बाळाला जन्म दिला. या घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पालिका रुग्णालयांची अवस्था, अपुरा कर्मचारी वर्ग, तज्ज्ञांची कमतरता आणि त्यामुळे रुग्णांचे होणारे हाल हे प्रश्न गांर्भियाने पुढे येत आहे. या घटनेची दखल घेत काही राजकीय पक्षांनी रुग्णालय आवारात येत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. पालिका रुग्णालयातील तसेच इतर विभागातील बहुतांश कर्मचारी वर्ग, संबंधित अधिकारी हे ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरात राहणारे आहेत.

वेळेला ते कधीच येथे उपस्थित नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांच्या येतात. पोलिसांनी विनंती करुनही एका गरोदर महिलेला तिच्या कठीण काळात दाखल करुन घेतले जात नसेल तर इतर महिलांच्या नातेवाईकांना हे काय दाद देत असतील त्यांची काय अवस्था होत असेल असे अनेक प्रश्न यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केले. पालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयात सिझरिन,

प्रसूृती वेदना होत असलेल्या महिलांना दाखल करुन घेतले जात नाही. त्यांना कळवा येथील छत्रपती रुग्णालयात किंवा रुग्णालयातील डाॅक्टर सांगेल त्या रुग्णालयात जाण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यावेळी केल्या आहेत. यावर पालिका प्रशासनाने संबंधित महिलेला पालिकेच्या वसंत व्हॅली येथील रुग्णालयात नेण्यासाठी रुक्मिणी बाई रुग्णालयातून रुग्णवाहिकेची सोय केली होती.

परंतु या महिलेला रुग्णवाहिकेत ठेवण्यापूर्वीच तिची प्रसूती झाली. रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूती विभाग वसंत व्हॅली येथे स्थलांतरित केला आहे. या महिलेला तेथे जाण्याची सूचना करण्यात आली असता त्याचवेळी तिची प्रसूती झाली. तिला त्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार मिळाले आहेत. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत. तरीही या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून माओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

PMC Election : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT