Mumbai News 
मुंबई

Mumbai News : मालाड येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू; २४ तासांत २६ ठिकाणी झाडपडी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईत पावसाने पडझडीचे सत्र सुरु असून आज सकाळी ७.२६ वाजता मालाड पश्चिम मामलेदार वाडी येथे पादचाऱ्याच्या अंगावर झाड कोसळले. या दुर्घटनेत कौशल दोशी ( ३८) यांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. गेल्या २४ तासांत मुंबई शहर व दोन्ही उपनगरात एकूण २६ ठिकाणी झाड व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

मालाड पश्चिम मामलेदार वाडी जंक्शन येथून जाणाऱ्या कौशल दोशी यांच्या अंगावर झाड कोसळले. या दुर्घटनेत ते जखमी झाले असता कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे डॉ. विनय यांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक पोलीस व मुंबई महापालिकेचे विभागीय अधिकारी पुढील तपास करीत आहेत.‌

२६ ठिकाणी झाडे कोसळली

मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे गेल्या २४ तासांत २६ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या. यात शहरात ४, पूर्व उपनगरात ८, पश्चिम उपनगरात १४ अशा एकूण २६ ठिकाणी झाडे, फांद्या कोसळण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.

१५ ठिकाणी शाॅर्ट सर्किट

गेल्या २४ तासांत १५ ठिकाणी शाॅर्ट सर्किटच्या घटना घडल्या असून यात शहरात ४, पूर्व उपनगरात ४ व पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १५ ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या.

पडझड

गेल्या २४ तासांत शहरात १, पूर्व उपनगरात ३ व पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ०५ ठिकाणी घराचा काही भाग पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT