Mumbai sakal
मुंबई

Mumbai : निफ्टी ३३ अंश वाढला; गुंतवणुकदारांना एक लाखकोटींचा नफा

आज निर्देशांकांनी फारशी वाढ दाखवली नसली तरीही बीएसई वरील सर्व गुंतवणुकदारांच्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य एक लाखकोटी रुपयांनी वाढले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भारतीय शेअरबाजार निर्देशांकांनी आज आपली आगेकूच कायम ठेवली, मात्र शेवटच्या तासात नफावसुली झाल्याने निर्देशांकांचा बराचसा फायदा निघून गेला. आज सेन्सेक्स १८.११ अंश तर निफ्टी ३३.६० अंश वाढला.

आज निर्देशांकांनी फारशी वाढ दाखवली नसली तरीही बीएसई वरील सर्व गुंतवणुकदारांच्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य एक लाखकोटी रुपयांनी वाढले. काल बीएसई वरील सर्व शेअरचे भांडवली बाजारमूल्य २७८.७९ लाखकोटी रुपये होते, ते आज २७९.७८ लाखकोटी रुपये झाले.

आज धातुनिर्मिती कंपन्या, औषध कंपन्या, वाहनिर्मिती कंपन्या, एफएमसीजी कंपन्या यांच्या शेअरची खरेदी झाली, तर आयटी आणि बांधकाम व्यवसाय यांच्या शेअरची विक्री झाली. दिवसअखेर सेन्सेक्स ६१,९८१.७९ अंशांवर तर निफ्टी १८,३४८ अंशांवर स्थिरावला.

बीएसई वर बजाज फीनसर्व्ह, टाटा मोटर, एशियन पेंट, आयटीसी व इंडसइंड बँक या शेअरचे भाव एक टक्का वाढले. तर टेक महिंद्र, टायटन, एचसीएल टेक, कोटक बँक, लार्सन अँड टुब्रो व सनफार्मा या शेअरचे भाव एक टक्का घसरले.

निफ्टीला सध्या १८,५०० च्या आसपास प्रतिरोध आहे, ती पातळी वरच्या दिशेने निर्णायकरित्या तोडून निफ्टी काही दिवस तेथेच टिकला तर १८,८०० च्या दिशेने तेजी सुरु होईल.

- रुपक डे, तांत्रिक विश्लेषक, एलकेपी सिक्युरिटीज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

SCROLL FOR NEXT