मुंबई

मायानगरीत महाक्वारंटाईनची व्यवस्था; शैक्षणिक संस्था ताब्यात घेणार!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील तब्बल 40 हजार रहिवाशांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था ताब्यात घेतल्या जाणार असून, महापालिका कृती आराखडा तयार करत आहे.

सध्या झोपडपट्टयांमधील अतीजोखमीच्या (हाय रिस्क) व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत आहे. आता कमी जोखमीच्या (लो रिस्क) व्यक्तींनाही क्वारंटाईन करण्यात येणार आहे. केंद्रीय समितीने धारावीला भेट दिल्यानंतर झोपडपट्ट्यांमधील हाय रिस्क व्यक्तींना घरात क्वारंटाईन न करता स्वतंत्र व्यवस्था करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार महापालिकेने 40 हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिका व खासगी शाळा आणि महाविद्यालयेही ताब्यात घेण्याचा प्रशासनाचा विचार आहे. 

महापालिकेने सध्या 11 हजार 997 जणांना क्वारंटाईन करता येईल, अशी व्यवस्था केली आहे. प्रामुख्याने झोपडपट्ट्या आणि चाळींमधील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत आहे. आतापर्यंत साधारणत: 4००० जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. एकूण 30 ते 40 हजार जणांना क्वारंटाईन करता येईल, अशी व्यवस्था केली जात आहे, असे असे महापालिका उपायुक्त रमेश पवार यांनी सांगितले. महापालिकेने दादर येथील शुश्रूषा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यासाठी रूपारेल महाविद्यालय यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे काही खासगी शाळाही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

मैदाने नको
नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी बंदिस्त जागेची गरज असल्याने महापालिकेने क्लब ताब्यात घेतले आहेत. त्यामध्ये वरळी नॅशनल स्पोर्ट़्स कॉम्प्लेक्सया मोठ्या बंदिस्त स्टेडियमचा समावेश आहे. खुली मैदाने घेण्याचा सध्या विचार नाही. खुल्या मैदानांमध्ये सुविधा उभाराण्यासाठी जास्त वेळ लागेल. त्यामुळे महापालिका शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यावर भर देणार आहे.

शाळांच्या इमारती
महापालिका : 1000 हून अधिक
खासगी : 2000 हून अधिक

90 हजार होम क्वारंटाईन 
मुंबईत सध्या सुमारे 90 हजार जणांना घरांतच क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यात झोपडपट्यांमधील रहिवाशांची मोठी संख्या आहे. त्यांनाही महापालिकेने ताब्यात घेतलेल्या इमारतींमध्ये ठेवले जाणार आहे.


धारावीतून 2500 ते 3000 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यासाठी रूपारेल महाविद्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. धारावी क्रीडा संकुलात 2484 खाटांची तयारी झाली आहे.
-किरण दिघावकर, सहायक आयुक्त, मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

३० नंतर टीम इंडियात एंट्री; ३५ व्या वर्षी विश्वचषक जिंकणारा कर्णधार... सूर्यकुमार यादवचा संघर्ष ते विश्वविजय प्रवासाची प्रेरणादायी यशोगाथा

मुलीची लग्नपत्रिका वाटून परतत होते; मात्र वाटेतच काळानं गाठलं, लग्नाआधीच लेकीचं पितृछत्र हरपलं

Akola News : ‘चिटफंड’चा वाद पेटला, प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत; ‘बीसी’चे पैसे न मिळाल्याने ग्राहक हैराण

SCROLL FOR NEXT