मुंबई

मुंबईतील सक्रिय प्रकरणांमध्ये आठवड्यात 41 टक्क्यांनी घट

भाग्यश्री भुवड

मुंबईः मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबईत सक्रिय कोविड -19 प्रकरणांची नोंद आठवड्यात 41 टक्क्यांनी घटली आहे. जी गेल्या सात महिन्यांमध्ये कमी नोंदवण्यात आली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, 18 डिसेंबरपर्यंत सक्रिय प्रकरणे घटून 7 हजार 362 वर गेली आहेत. जी 12 डिसेंबरपर्यंत 12 हजार 464 एवढी होती.

पालिका अधिकारी आणि आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, कोविड रूग्णांच्या सुधारलेल्या रिकव्हरी दरातील महत्त्वपूर्ण भाग म्हणजे आता उपचार प्रोटोकॉलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. सक्रिय रूग्णसंख्या ही अशी एकूण रूग्णांची संख्या आहे जी सध्या रूग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत किंवा घरी क्वारंटाईन आहेत.

31 मे पासून मुंबईत सक्रिय कोविड -19 केसेसची नोंद ठेवण्यास सुरुवात केली. जेव्हा 19 हजार 745 रुग्णांची नोंद केली गेली. 18 सप्टेंबरला याची संख्या वाढली आणि मार्चमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंतची सर्वात जास्त नोंद होत हा आकडा 34 हजार 136 वर पोहोचला. ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह राज्यात सर्वाधिक सक्रीय संसर्ग पसरला. दरम्यान, आता शहराच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. मात्र, अजूनही पुण्यात (16, 865) आणि ठाण्यात ( 10,897) मध्ये कोविड -19 प्रकरणांची सर्वाधिक नोंद होत आहे.

पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकणी म्हणाले की, मुंबईत कोरोना प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यात त्यांना चांगले परिणाम दिसून आले आहेत. मात्र, कोविडच्या तयारीबाबत तडजोड केली जाणार नाही आणि कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांना कोविड -19 चे प्रोटोकॉल पाळावे लागतील. "ऑक्सिजन पुरवठा, बेडसची क्षमता, औषधे आणि वैद्यकीय कर्मचारी या सर्वाची योग्य खबरदारी घेत आहोत. भविष्यात मुंबईत कोणत्याही प्रकारच्या विषाणूच्या लाटेसाठी तयार असले पाहिजे. " 

शिवाय, जेव्हा कोविड असल्याची लक्षणे ओळखण्याची आणि त्वरित वैद्यकीय मदत मिळविण्याविषयी विचार केला जातो तेव्हा लोक अधिक संवेदनशीलपणे वागत आहेत, जे जलद रिकव्हरीस मदत करते. सक्रिय प्रकरणांचा गुणाकार होऊन संख्या वाढत होती
मात्र, तपासणीनंतर ही संख्या खाली आली आहे.

“आम्ही सर्व प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन आणि अनुसरण करत आहोत आणि उपचार प्रोटोकॉलच्या संदर्भात कोणतीच शंका ठेवलेली नाही. चांगल्या रिकव्हरीचा हा देखील एक प्रमुख घटक आहे, ”काकणी यांनी सांगितले.

राज्यातील कोविड -19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची घट झाली आहे. कमी आर्द्रतेसारखे घटक देखील यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. सक्रिय प्रकरणांमध्ये झालेली कपात ही चांगली बातमी असली तरी आम्हाला नागरिकांकडून अधिक सहकार्याची आवश्यकता आहे जेणेकरून ही संख्या आणखी कमी होईल.”

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai number active Covid 19 cases Decrease by 41 per cent week

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid: सिंगापूरनंतर भारतातही परसरला कोरोनाचा नवा प्रकार; 300 हून अधिक लोकांना संसर्ग

Nigeria Firing: अमानुष! बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात ४० लोक ठार; पीडित म्हणाले, त्यांनी आमची...

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

SCROLL FOR NEXT