मुंबई

मुंबईत गेल्या 24 तासात 908 कोरोना रुग्णांची वाढ, तर रुग्ण बरे होण्याचा दर 89 टक्क्यांवर

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत आज 908 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,58,408 झाली आहे. मुंबईत आज 25 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,275 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,716 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,29,538 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 89 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत 171 दिवसांवर गेला आहे. तर 31 ऑक्टोबर पर्यंत एकूण 15,37,356  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 25 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.41 इतका आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 25 मृत्यूंपैकी 17 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 16 पुरुष तर 9 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 25 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षा खालील होते,  5 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 19 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. 

मुंबईत 584 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 7,265 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 9,660 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 721 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
-------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT