Cyber Crime News
Cyber Crime News esakal
मुंबई

Cyber Crime : मुंबईत 80 वर्षीय वृद्धाची 3 लाखांहून अधिकची सायबर फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

मुंबईतील एका 80 वर्षीय व्यक्तीने आपला वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून यासाठी वीज बिलाची थकबाकी भरण्यास सांगणाऱ्या फसव्या संदेशाला बळी पडून 3 लाखांहून अधिक रुपये गमावले.

मुंबई - मुंबईतील एका 80 वर्षीय व्यक्तीने आपला वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून यासाठी वीज बिलाची थकबाकी भरण्यास सांगणाऱ्या फसव्या संदेशाला बळी पडून 3 लाखांहून अधिक रुपये गमावले आहेत. कांदिवली येथे पत्नीसोबत राहणाऱ्या निवृत्त खासगी अकाउंटंटच्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराच्या बँक खात्यातून फसवणूकीने 3.27 लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 5 डिसेंबर रोजी पिडीत व्यक्तीच्या फोनवर एक संदेश प्राप्त झाला. पिडीत व्यक्तीने नोव्हेंबरचे वीज बिल भरले नसल्यामुळे त्याचा विन पुरवठा कनेक्शन खंडित केला जाईल असे संदेशात म्हटले होते. दुसर्‍या दिवशी वृध्द व्यक्तीने मेसेजमध्ये नमूद केलेल्या कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधला आणि त्याने आधीच बिल भरले असल्याचे त्यांना कळवले.

परंतु अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि.चे एक्झिक्युटिव्ह म्हणून फोनवर बोलणार्‍या फसवणुक करणाऱ्याने पिडीत वृद्धचे पेमेंट मिळालेले नसून पुन्हा पैसे भरण्यास सांगितले अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल आणि कनेक्शन पुनर्संचयित करण्यासाठी त्याला 10,000 रुपये दंड ठोठावला जाईल अशी धमकी दिली

पिडीत वृद्ध व्यक्ती दबावाखाली येऊन पुन्हा बिल भरण्यास तयार झाले. फसवणूक करणाऱ्याने नंतर एटीएम कार्ड आणि त्या व्यक्तीचे आणि त्याच्या पत्नीचे बँक खाते तपशील घेतले. काही तांत्रिक समस्या असल्याचे सांगून त्याने तक्रारदाराला वन टाइम पासवर्ड (ओटीपी) अनेक वेळा शेअर करायला लावला , एकूण पाच व्यवहारांमध्ये एकूण 3.27 लाख रुपये काढण्यात आल्याचे तक्रारीत सांगितले आहे. चारकोप पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

Mallikarjun Kharge: मतदानाच्या टक्केवारीत अनेकदा बदल, खर्गेंनी व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगानं फटकारलं

SCROLL FOR NEXT