Mumbai sakal
मुंबई

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २३ एप्रिल २०२३ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम - मुंबई सेंट्रल अँप जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

कुठे- माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर

कधी- सकाळी ११ .०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येणार आहे.

ठाणे येथून अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

हार्बर रेल्वे

कुठे - सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर

कधी - ११. १० ते ४.४० वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी /वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा लोकल चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे-

कुठे- मुंबई सेंट्रल ते माहिम अप जलद मार्गावर

कधी - शनिवारी रात्री १२ ते पहाटे ४ जेपर्यंत

परिणाम -ब्लॉक कालावधीत अप जलद मार्गांवरील लोकल सेवा अंधेरी ते सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गांवर वळविण्यात येणार आहे. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adult Content Addiction : अडल्ट कंटेंट पाहणे दारु अन् सिगारेटच्या व्यसनापेक्षाही घातक; डॉक्टरांनी तरुणाईला दिला धोक्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

IPL ची व्हॅल्यू कमी झाली! ऑनलाईन गेमिंगवरील बंदीचा फटका

Trump On Modi : रशियाच्या तेलावरून पुन्हा ‘ट्रम्प बाँब’, खरेदी थांबविण्याचे पंतप्रधान मोदींकडून आश्वासन मिळाल्याचा दावा

Solapur Fraud: 'मुंबईच्या व्यापाऱ्याला बार्शीत १२ लाखांना गंडवले'; पोकलेन मशिन खरेदीतून भागीदारी व्यवसायाचे आमिष

SCROLL FOR NEXT