मुंबई

'भातखळकर जरा शांत घ्या', मॅनहोल्सवरुन महापौरांची शाब्दिक चकमक

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत काल मुसळधार पाऊस (heavy rain) कोसळला. यावेळी अनेक भागात पाणी साचलं होतं. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मॅनहोल्स उघडी राहिल्यामुळे (open manholes issue) दुर्घटना घडतात. कालही भांडूपच्या व्हिलेज रोडवर एका क्लासच्या बाहेर मॅनहोल उघड राहिलं होतं. रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं होतं. त्यात हे मॅनहोल्स उघडे होते. यावेळी भांडूप व्हिलेज (bhandup village) रोडवरुन जाणाऱ्या दोन महिला त्या मॅनहोल्समध्ये पडल्या. सुदैवाने पाऊस कमी होता आणि पाण्याचा दबाव नव्हता. त्यामुळे या महिला बचावल्या. वाहून गेल्या नाहीत. (Mumbai open manholes issue bjp mla atul bhatkhalkar & mumbai mayor kishori pednekar criticize each other)

गेल्यावर्षी घाटकोपमध्ये असल्फा भागात असाच मुसळधार पाऊस सुरु असताना एक महिला मॅनहोलमध्ये पडून वाहून गेली होती. तिचा मृतदेह नंतर समुद्रात सापडला होता. त्याआधी प्रभादेवी परिसरात कामावरुन घरी परतणाऱ्या एका प्रतिथयश डॉक्टरांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. इतक्या साऱ्या घटना घडल्यानंतरही महापालिकेला जाग आलेली नाही. सध्या अनेक मॅनहोल्सवरची झाकणं प्लास्टिकची आहेत. पाण्याच्या प्रेशरमध्ये ती झाकणं वाहून जातात.

पालिकेच्या या गलथान कारभारावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. "या घटनांमधून आपण बोध घेणार नसू आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाईची भीती वाटणार नसेल, तर असाच निष्काळजीपणा पुढेही सुरु राहीलं. अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे" असे देशपांडे म्हणाले.

"काही हजार मॅनहोल्स मुंबईत आहेत. त्यात ४० टक्के मॅनहोल्सवर जाळ्या लावून आणि चांगली झाकणं लावून बंद केली आहेत. मॅनहोल्सवर जाळ्या लावण्याचं काम महापालिका करत नाही हे दुर्देव आहे. ८० हजार कोटीच्या ठेवींवर महापालिकेला १६०० कोटी व्याज मिळालं. तरी सुद्धा गलथान कारभार आहे. तुम्ही मुंबईकरांवर पैसे खर्च करायला तयार नाही. ही मोगलाई आहे. मॅनहोल बंद करता येत नाही. वॉर्ड ऑफीसरला तात्काळ निलंबित करा" अशी मागणी भातखळकर यांनी केली.

उघड्या असलेल्या मॅनहोल्सच्या मुद्यावरुन एका वृत्तवाहिनीवर यावेळी भातखळकर आणि किशोरी पेडणेकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. "कोणाचा प्रश्न आहे हे महत्त्वाचे नाही. लोक सुद्धा पाणी जाण्यासाठी काही वेळा जाळी उघडतात. बजेट वैगेरेबद्दल बोलण्याची गरज नाही. आमच्यासाठी हे महत्त्वाचं नाही. बजेट होतं म्हणून मुंबई वाचवली. आवाज करायला मिळाला म्हणून कसाही आवाज करायचा. जरा शांत घ्या, आम्ही पण त्याच मुंबईत राहतो. आम्ही पण करदाते आहोत. उगाचाच काहीही बोलू नका. कुठे वडाची साल पिंपळाला लावताय. तिथल्या वॉर्ड ऑफिसरला सांगू. तुमचा भरवसा नाही. काहीही कराल तुम्ही आणि व्हिडिओ पाठवाल" असा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भातखळकरांवर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT