crime-court.jpg 
मुंबई

मुंबईत खटला लढवणाऱ्या वकिलानेच अशीलाच केलं अपहरण, जाणून घ्या कारण...

दीनानाथ परब

मुंबई: आपल्या वकिलाच्या सेवेची फी न भरणे मुंबईत एका बिझनेसमॅनला चांगलेच महाग पडले आहे. या वकिलाने थेट आपल्या बिझनेसमॅन अशीलाचं अपहरण करुन फार्महाऊसवर त्याचा छळ केला. 

दरम्यान अशीलाचं अपहरण केल्याप्रकरणी एका ४५ वर्षीय वकिलाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. ज्याचं अपहरण झालं, तो  अशील एका शिपिंग कंपनीचा मालक आहे. अशीलाने कोर्टातील युक्तीवादाच्या फी पोटीचे वकिलाचे ३ कोटी रुपये थकवले होते. फसवणुकीच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातून जामिन मिळवून देण्याचे हे प्रकरण होतं. 

वकिल विमल झा यांनी दोन एप्रिलला नवनाथ गोळे यांचे अपहरण केले, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विमल बिडवी यांनी सांगितले. गोळे यांनी पैसे द्यायला नकार दिला, तेव्हा झा यांनी संपत्ती ट्रान्सफर करण्यासाठी गोळेवर दबाव आणला व नाशिकच्या फार्महाऊसवर त्यांचा छळ केला, असे पोलिसांनी सांगितले. खारघर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी वकिल विमल झा यांना अटक केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT